23.9 C
Gondiā
Saturday, August 1, 2026
Home शैक्षणिक जगत महाविद्यालयातर्फे कोवीड19 काळात राष्ट्रीय वेबीनारचे आयोजन

जगत महाविद्यालयातर्फे कोवीड19 काळात राष्ट्रीय वेबीनारचे आयोजन

0
313

गोरेगाव,दि.16ः– स्थानिक जगत कला,वाणिज्य व इंदिराबेन हरिहरभाई पटेल विज्ञान महाविद्यालय गोरेगाव येथे कोवीड 19 च्या काळात शैक्षणिक चर्चा घडवून शैक्षणिक स्तर उंचवण्यासाठी ग्रंथालय विभागामार्फत बहुजन हिताय जगत शिक्षण सस्थेचे अध्यक्ष जगतरामजी रहांगडाले व सचिव नारायणरावजी येळे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ .एन.वाय.लंजे यांच्या अध्यक्षतेखाली अध्ययन व अध्यापण कौशल्यात ग्रथांलयाची भूमिका या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय वेबीनारचे आयोजन करण्यात आले होते .या वेबीनारचे बीजभाषक म्हणून एम. एस.एस.आय .एस .डब्ल्यू . महाविद्यालयाचे ग्रथंपाल डाॅ .प्रीन्स अजयकुमार आगासे तर प्रमुख वक्ता म्हणून बी .आर .आंबेडकर महाविद्यालयाचे उपग्रथंपाल डाॅ .शिवा कनौजिया शुक्ला व इन्फ्लोवर सेंटर गांधीनगर,गुजरातचे वैज्ञानिक डाॅ .पल्लव प्रधान यांनी मौलिक मार्गदर्शन केले .सदर वेबीनारमध्ये मोठ्या संख्येने झूमव्दारे प्राध्यापक, विद्यार्थी, अभ्यासक, श्रोते सहभागी झाले होते. प्राचार्य डॉ .एन .वाय .लंजे यांनी मौलिक मार्गदर्शन केले तसेच कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरीता महाविद्यालयाचे उपप्राचार्य डाॅ.एस .एच .भैरम,ग्रंथपाल प्रा.इ .व्ही .चंदनखेडे, सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.या वेबीनारचे संचालन डाॅ.जी .के .भगत तर आभार प्रा .इ.व्ही .चंदनखेडे यांनी मानले .