विजुक्टाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

0
12

गोंदिया दि.२५: विदर्भ ज्युनिअर कॉलेज टीचर्स असोसिएशनच्या वतीने बुधवार (दि.२२) दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोच्याचे नेतृत्व प्रांत उपाध्यक्ष प्रा. शशिनिवास मिश्रा, जिल्हाध्यक्ष प्रा. एम.जी. दस्तगीर, जिल्हा सचिव प्रा. ज्योतिक ढाले, प्रांत सदस्य प्रा. रोमेंद्र बोरकर यांनी केले.
फुलचूर येथील फुंडे विज्ञान महाविद्यालयातून मोर्चा काढण्यात आला व जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचला. तेथे निवासी उपजिल्हाधिकारी एन.एस. लोणकर यांना मुख्यमंत्री व शिक्षण मंत्री यांच्या नावाने निवेदन देण्यात आले. शासनाने नवी समस्या कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांसमोर उभी केली आहे. सदोष ऑनलाईन प्रक्रियेमुळे महाराष्ट्रातील हजारो शिक्षक अतिरिक्त ठरतील. या सॉफ्टवेअर प्रोग्राममध्ये शासनाने त्वरित दुरूस्ती करावी, यासाठी सदर मोर्चा काढण्यात आला.
निवेदनानुसार, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या प्रमुख मागण्यांमध्ये सन २0१४-१५ पासून संपूर्ण राज्यात कनिष्ठ महाविद्यालयांची समूह मान्यता ऑनलाईन करण्यात आली आहे, परंतु विद्यार्थी संख्येच्या समुहासाठी निकष शासन निर्णय १९९९, २000, २00९ यांना विचारात घेण्यात आले नाही. एकापेक्षा अधिक समुहासाठी शहरी, ग्रामीण, आदिवासी व माध्यमिक शाळांना जोडून विद्यार्थी संख्या वेगवेगळी ठेवण्यात आली आहे. परंतु ऑनलाईन साफ्टवेअरमध्ये याची कसलीही तरतूद करण्यात आली नाही. कनिष्ठ महाविद्यालयीन प्रशासन स्वतंत्र करण्यात यावे. समूह वाचविण्याचा निकष शिथिल करण्यात यावे. सेवानवृत्तीचे वय ६0 वर्षे करण्यात यावे व इतर मागण्यांचा समावेश आहे. याप्रसंगी सदर निवेदन त्वरित मुख्यमंत्री व शिक्षण मंत्री यांना पाठविण्याचे आश्‍वासन उपजिल्हाधिकारी यांनी दिले.
मोच्र्याच्या यशस्वितेसाठी प्रा. अरविंद शरणागत, प्रा. गिरीधर बोरकर, प्रा. पी.झेड. तुरकर, प्रा. सुनील लिचडे, प्रा. चंद्रकिशोर मोरघडे, प्रा. रूखसाना हसन, प्रा. दर्शना वासनिक, प्रा. संजय कलंबे, प्रा. गोवर्धन मेश्राम, प्रा. जागेश्‍वर भेंडारकर, प्रा. खेमलाल लांजेवार, प्रा. बी.डी. फुलकटवार, प्रा. सी.आर. बिसेन, प्रा. आर.आर. बोपचे, प्रा. व्ही.जे. जाऊळकर, प्रा. अरविंद शरणागत, प्रा.पी.झेड. कटरे, प्रा. संजय कंळबे, प्रा. जी.एम. झामरे आदींनी सहकार्य केले.