‘आयआयएम-नागपूर’चे उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

0
11

नागपूर दि.२५: महाराष्ट्रातील पहिले ‘आयआयएम’ असलेल्या ‘आयआयएम-नागपूर’चे उद्घाटन २६ जुलै रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होईल. सिव्हिल लाईन्समधील चिटणवीस सेंटर येथे सकाळी १० वाजता आयोजित या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, ‘आयआयएम-अहमदाबाद’चे संचालक प्रो. आशिष नंदा, अधिष्ठाता प्रो. अजय पांडे उपस्थित राहतील. ‘व्हीएनआयटी’ येथील तात्पुरत्या ‘कॅम्पस’मध्ये ‘आयआयएम-नागपूर’ सुरू आहे. सोमवारपासून वर्गही सुरू झाले आहेत. ‘आयआयएम-अहमदाबाद’कडे नागपूरमधील संस्थेचे पालकत्व देण्यात आले आहे.