पोलिस ठाणे सालेकसा येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन

0
18

सालेकसा,दि.30ः– पोलिस अधिक्षक विश्‍व पानसरे यांच्या संकल्पनेनुसार नक्षलग्रस्त भागातील युवकानां रोजगार उपलब्ध व्हावा याकरिता २८ मार्च रोजी सालेकसा येथे कमांडेंट कार्यालय क्षेत्रीय प्रशिक्षण केंद्र आरा, जशपुर यांचे तर्पेष्ठ १0 वी व १२ वी पास युवकासाठी सुरक्षा रक्षक, सुरक्षा सुपरवाइजर (सेक्युरिटी गार्ड) पदासाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यात ४६५ युवकांनी भाग घेतला होता.
मेळाव्यात उपस्थित युवकानां गोंदियाचे अप्पर पोलिस अधिक्षक देवरी कैम्प अशोक बनकर, आमगांवचे उपविभागीय पोलिस अधिकारी विजय भिसे, सालेकसाचे पोलिस निरीक्षक वैशाली पाटिल यांनी मार्गदर्शन केले. आयोजित मेळाव्यात सदर भर्ती प्रकियेमधे ४६५ युवकांनी भाग घेतला होता. त्यापैकी १0९ युवक ऊंची, छाती, वजन यामधे पात्र ठरले असून त्यांची लेखी परीक्षा घेण्यात आले असता यातून ७४ युवकांची निवड करण्यात आले. सदर निवड झालेल्या युवकांना ९ एप्रिल रोजी कमांडेंट कार्यालय क्षेत्रीय प्रशिक्षण केंद्र आरा, जशपुर येथे प्रशिक्षण करिता पाठवन्यात येणार आहे. भर्ती प्रकिया यशस्वी करण्यासाठी नक्षलग्रस्त भागातील जास्तीत जास्त युवकांना रोजगार मिळावे यासाठी सालेकसा पोलिस स्टेशन येथील अधिकारी, अमलदार, तसेच नक्षलसेलचे अधिकारी व अंमलदार यांनी अथक पर्शिम घेतले. याच प्रकारचा भर्ती मेळावा २९ मार्च रोजी पोलिस स्टेशन देवरी, ३0 मार्च रोजी पोलिस स्टेशन चिचगड, ३१ मार्च रोजी पोलिस स्टेशन नवेगावबांध, १ एप्रिल रोजी पोलिस स्टेशन केशोरी, २ एप्रिल रोजी पोलिस स्टेशन डुग्गीपार येथे आयोजित करण्यात आले आहे. बेरोजगार युवकांनी याचा लाभ घ्यावा, असे आव्हान पोलिस विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.