पर्यटनाच्या दृष्टीने गोंदिया जिल्हा समृद्ध,प्रसिध्दीपासून मात्र दूर

0
46

खेमेंद्र कटरे
गोंदिया दि. २७-गोंदिया जिल्ह्याला नैसर्गिक समृध्दीचा वारसा लाभल्याने जिल्ह्यात नागझिरा व्याघ्र प्रकल्प व नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान यांसारखे प्रकल्प तयार करण्यात आले. त्यामुळे नैसर्गिक पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक जिल्ह्यात येत असतात.सालेकसा तालुक्यातील हाजराफॉल हा धबधबा एक पावसाळी पर्यटनस्थळ म्हणून विकसीत झाला आहे.तर कचारगड हे आदिवासी समाजासाठी धार्मिक स्थळ असले तरी आशिया खंडात सर्वात मोठी गुफा म्हणून कचारगडचा उल्लेख केला जातो.यासोबतच इटियाडोह धरण आणि त्याला लागूनच असलेले तिबेटीयन संस्कृतीचे दर्शन घडविणारी तिबेटीयंन वस्ती या जिल्ह्यातील मुख्य पर्यटनस्थळाचे केंद्र आहेत.वनसंपदा आणि नैसर्गिक सौंदर्य लाभलेल्या गोंदिया जिल्ह्यात व्याघ्र संवर्धनास भरपूर वाव आहे. त्यामुळेच केंद्र सरकारने तीन वर्षांपूर्वी नागझिरा-नवेगाव व्याघ्र प्रकल्पाची घोषणा केली. अजूनही वनपर्यटनाची आवड असणाऱ्या पर्यटकांची पावलं इकडे वळत नाहीत. कारण एकच, ते म्हणजे मार्केटिंगचा अभाव.

दोन वर्षांपूर्वी तत्कालीन पालकमंत्री अनिल देशमुख यांनी नागझिरा महोत्सवाची कल्पना मांडली होती. या महोत्सवाच्या निमित्ताने बाहेरील पर्यटक येथे येतील. येथील वनपर्यटनाचे मार्केटिंग करता येईल अशी त्यांची कल्पना होती. त्यादृष्टीन नागझिऱ्यावरील माहितीपटही तयार करण्यात आला. मात्र नंतर महोत्सवाचे स्वरूप, त्यावरील खर्चाची तरतूद या विषयावर कोणीच पुढाकार घेतला नाही. त्यामुळे या महोत्सवाची कल्पनाच मागे पडली.

या पर्यटनस्थळाकडे बघितल्यास सांस्कृतिक आणि सामाजिक एकतेसोबतच निसर्गरम्य पर्यटनाचा आस्वाद या जिल्ह्यात घेता येऊ शकतो.परंतु प्रशासनाने या पर्यटनाच्या प्रसिध्दीसाठी काहीच न केल्याने मोठा विदेशी पर्यटक हा या जिल्ह्यात येऊ शकला नाही.त्यापेक्षा देशी पर्यटकच या भागाकडे अद्यापही फिरकलेला नसल्यानेच नागझिरा,नवेगावबांध,इटियाडोह,गोठणगाव,कचारगडचे महत्व पर्यटनप्रेमीपर्यंत पोचू शकले नाही.
नव्याने तयार झालेल्या नवेगाव न्यु नागझिरा व्याघ्रप्रकल्पाला पाहिजे तशी प्रसिध्दी अद्यापही न मिळाल्याने पर्यटक ताडोबा व कान्हाकेसरीकडेच जातांना दिसून येतो.विशेष म्हणजे मोठ मोठी उद्योजक मंडळी गोंदियाच्याच विमानतळावर खासगी विमानाने येऊन कान्हा केसरीला जातात.परंतु त्या उद्योजक पर्यटकांना आपण आपल्या नागझिरा,गोठणगावकडे वळवू शकलो नाही.

जिल्ह्यातील सालेकसा हा नक्षलग्रस्त व आदिवासी तालुक्याला लाभलेले वनवैभव आणि सांस्कृतिक वारसासोबतच पर्यटनस्थळामुळे या तालुक्याचे नाव शेजारील राज्यातच नव्हे तर विदेशापर्यंंत पोचले आहे.परंतु याा सालेकसा तालुक्यातील दरेकसा जवळील हाजराफॉल आणि आदिवासी समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या कचारगड गुहेकडे झालेल्या दुर्लक्षामुुळे हे स्थळ विकसीत होऊ शकले नाही.
या स्थळाला भेट दिली की मनाला जी शांती नैसर्गिक परिसर बघून मिळते ती वेगळीच परंतु त्या ठिकाणी जाण्यासाठी नसलेली व्यवस्थित सोय आणि पर्यटकांना मार्गदर्शन करण्याकरिता नसलेल्या यंत्रणेमुळे पर्यटकांच्या हाती निराशा लागते.
हाजराफॉलकडे जाणारा रस्ता हा अद्यापही कच्चा असल्ङ्माने पर्यटकांची वाहने ही त्या स्थळापर्यत जाऊ शकत नाही.मुुख्य रस्त्याच्या कडेला वाहने ठेवून दीड किलोमीटरचा अंतर पायदळ तुडवत जावे लागते.त्याचठिकाणी धबधबा बघायला जाणारे पर्यटक हे सरळ पाण्याजवळ जात असल्याने काही पर्यटकांचा मृत्यूची घटना सुध्दा याठिकाणी घडल्या आहेत.
विशेष म्हणजे नक्षलवाद्याच्या नावावर दाखविण्यात येणारी भिती ही याच नव्हे तर गोठणगाव,इटियाडोह,मुरदोली.धास पर्यटनस्थळाच्या विकासाला बाधा ठरली आहे.

मुख्य रस्त्यापासून धबधब्यापर्यत जाण्यासाठी पक्का डांबरीकरण रस्ता हवा.धबधब्याच्या ४०० ते ५०० मीटर आतपर्यंत वाहने नेण्याची सुविधा असावी.त्याठिकाणी प्रसाधनगृह,उपहारगृह,विश्रामगृह निर्माण केले तर परिसरात होणारी घाण टाळता येईल तसेच पर्यटकांना विश्रातीसांठी स्थळ सुध्दा उपलब्ध होऊ शकेल.
ङ्मा स्थळाचा विकास झाल्ङ्मास सालेकसा तालुकास्थळी पङ्र्मटनानि‘ित्त आलेल्ङ्मांच्ङ्मा ‘ााध्ङ्म‘ातून इतर व्ङ्मवसाङ्मला चालना ‘िळू शकते.तसेच कचारगड सारख्ङ्मा एशीङ्मा खंडातील गुहेचे चांगले दर्शन होऊ शकते.ङ्मासाठी त्ङ्माठिकाणी जाण्ङ्मासाठी पक्का रस्ता आणि गुहेच्ङ्मा शेजारी श्नङ्मतोवर ए‘टीडीसी किंवा वन्ङ्मजीव विभागाने छोटेखानी सांस्कृतिक ‘ाार्गदर्शन केंद्र व उपहारगृह उभारल्ङ्मास देशातील कोपèङ्मातून ङ्मेणाèङ्मा आदिवासी बांधवाना चांगला लाभ होऊ शकतो.

पर्यटनाच्या दृष्टीने समृद्ध असल्याचे दिसत आहे. परंतु शासनाचे ‘औद्योगिकरण म्हणजेच विकासङ्क हे धोरण असल्याने निसर्गाने नटलेल्या जिल्ह्याच्या दृष्टीने शासनाचे धोरण घातक ठरेल. शासनाने जिल्ह्यात पर्यटनाला चालना दिल्यास नैसर्गिक साधनातूनच जिल्ह्याचा विकास व रोजगाराच्या समस्या मार्गी लागेल हे निश्चित.
गोंदिया जिल्ह्याला निसर्गाचं लेणं लाभलेलं आहे. आजघडीला जवळपास ३० टक्के क्षेत्र हे वनांनी आच्छादीत आहे. जिल्ह्यात नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान व नागझिरा अभयारण्य यांसारखे प्रकल्प असल्याने येथे दरवर्षी हजारो पर्यटक येत असतात. यंदाचा विचार केल्यास मागील पाच वर्षाच्या तुलनेत पर्यटकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. जिल्हा नैसर्गिकदृष्ट्या समृद्ध असल्याने नैसर्गिक पर्यटनाचा व वन्यजीव बघण्याचा आनंद लुटण्यासाठी येणाèया पर्यटकांची संख्या सातत्याने वाढतच आहे.