पं.दिनदयालजींनी दिला अंतीम घटकांच्या विकासाचा सिद्धांत-अग्रवाल

0
6

-जयंती दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन
गोंदिया , दि. २७: -थोर विचारवंत, कुशल संघटक, भारतीय संस्कृतीचे गाढे अभ्यासक व भारतीय जनसंघाचे जेष्ठ नेते पंडीत दिनदयाल उपाध्याय यांनी एकात्म मानववाद व अंत्योदयाचा सिद्धांत या देशाला दिला. समाजातील अंतिम घटकांचा संपूर्ण विकास करण्याच्या दृष्टीकोनातून त्यांनी मोलाचे कार्य केले आहे. ते कुशल अर्थqचतक, राजनितीज्ञ, वक्ता, लेखक व पत्रकार ही होते. भारतीय समाजाचे एक मोठे समाजसेवकासह ते एक साहित्यकारही होते. त्यांनी दिलेला अंत्योदयाच्या व एकात्म मानववादाच्या सिद्धांतावर माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी कार्य करुन देशाचा विकास साधला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ही त्यांच्याच सिद्धांतावर कार्य करीत असून समाजातील शेवटच्या घटकाकरिता योजना तयार करुन जिवनमान उंचावण्याचे कार्य करीत आहेत, असे प्रतिपादन भाजपाचे जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांनी केले.
ते २५ सप्टेंबर रोजी येथील शासकीय विश्रामगृहात भारतीय जनता पक्षातर्फे आयोजित पंडीत दिनदयाल उपाध्याय यांच्या जयंती दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी प्रामुख्याने आमदार संजय पुराम, माजी आमदार केशवराव मानकर, भजनदास वैद्य, खोमेश रहांगडाले, प्रदेश सदस्य राकेश शर्मा, अशोक इंगळे, नेतराम कटरे, जि.प. उपाध्यक्ष रचना गहाणे, जि.प. सभापती देवराम वडगाये, छायाताई दसरे, मजुर सहकारी संघाचे अध्यक्ष झामqसग येरणे, जिल्हा महामंत्री विरेंद्र अंजनकर, देवरी पं.स.सभापती देवकी मरई, जयंत शुक्ला आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन जिल्हा महामंत्री विरेंद्र अंजनकर यांनी केले. यावेळी ग्रामीण मंडळ अध्यक्ष नंदकुमार बिसेन, तालुकाध्यक्ष चत्रुर्भूज बिसेन, शामराव शिवणकर, रघुनाथ लांजेवार, लक्ष्मण भगत, नामदेव कापगते, जि.प.सदस्य अल्ताफ हमीद, जि.प.सदस्य सरिता रहांगडाले, प्रविण दहिकर, राजेंद्र बडोले, डी.के. झरारिया, अमित झा, सुनील केलनका, महेंद्र बघेले, दामोदर नेवारे, छत्रपाल तुरकर, सुरेश कोसरकर, नितीन कटरे, घनश्याम अग्रवाल, पंकज सोनवाने आदी पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.