गोठणगावात दारूमुक्तीसाठी ६५ महिला एकवटल्या

0
11

अर्जुनी मोरगाव,दि ४: देशी दारुदुकान स्थानांतरण करण्याबाबत गोठणगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयात लालबहादूर शास्त्री व महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. या ग्रामसभेत गावातील सरकारी देशी दारुचे दुकान गावाच्या बाहेर स्थानांतरण करण्याचा ठराव घेण्यात आला.तसेच यासाठी भारत मिशन स्वच्छता समिती गठित करण्यात आली. त्या समितीच्या अध्यक्ष निर्मला ईश्‍वार, उपाध्यक्ष किशोर टेंभूर्णे, सदस्य सरपंच शकुंतला वालदे, उपसरपंच, राजू इश्‍वार, सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष नवाजी राणे, तंटामुक्त समिती अध्यक्ष गणेश राणे, दीपक राऊत, पतीराम राणे, नामदेव निखारे, शिंदू निर्वाण, गीता टेंभुर्णे, पी.आर. नाकाडे, जे.जी. जाधव, सुवर्णा टेकाम, किरण राणे, गौतम डोंगरवार, रतिराम राणे, किशोर टेंभुर्णे, कुसुम प्रत्येकी, गोपाल देवारी, हिरा कोसरे, रेखा चौबे, विशाखा कर्‍हाडे, रवि टेंभुर्णे व उर्मिला राऊत यांची निवड करण्यात आली.
ग्रामसभेला एकूण ६५ महिला सहभागी झाले होते. येथील दारू दुकानाजवळ शासकिय विहिर आहे. त्या विहिरीवर महिला पाणी भरीत असतात. पाणी घेऊन मुख्य रस्त्यांने जातांना दारूडे महिलांना त्रास देतात. एवढेच नाही तर देशी दारु दुकानावजळ प्रतिष्ठित नागरिकांचे वास्तव्य आहे. परंतु दारु पिणारे अश्लील शब्दाचा वापर करून एकमेकांना शिव्या घालतात. त्यामुळे सुज्ञ नागरिकांना राहणे कठिण झाले आहे. दारूमुळे गावाचे वातावरण दूषित होत असून महिलांच्या सुरक्षितेतवर प्रश्न निर्माण होत आहे. प्रतिष्ठित नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. याकरिता देशी दारुचे दुकान गावाच्या बाहेर न्यावे असा ठराव पारीत करण्यात आला आहे. लाल बहादूर शास्त्री, महात्मा गांधी, संत गाडगेबाबा व राष्ट्रसंत तुकाराम महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन ग्रामसभेची सुरूवात करण्यात आली. अध्यक्षस्थानी सरपंच शकुंतला वालदे, प्रमुख अतिथी पंचायत समिती सदस्य सुशीला हलमारे, निर्मला ईश्‍वार, ग्राम पंचायत सदस्य भागरथा राणे, हिरा कोसरे, कमल साखरे, पतीराम राणे उपस्थित होते. ग्रामसभेमध्ये एमआरजीएफ कामाची माहिती आयपीई २ ची महिती, लोकसेवा अध्यादेशाचे वाचन, तांडावस्तीचा बृहत आराखडा तयार करणे व भारत स्वच्छ मिशन समिती तयार करण्यावर चर्चा करण्यात आली.