केमिकलच्या ड्रम मध्ये स्फोट, तीन गंभीर जखमी

0
3

गोंदिया,दि.४ -शहरातील मुर्री रोड येथील बाजपेई चौक परिसरातील विजय मार्केिटगच्या फर्निचर कारखान्यात केमीकलच्या ड्रममध्ये जबरदस्त स्फोट झाल्याची घटना आज (ता. ४) सायंकाळी ५ : १० वाजताच्या सुमारास घडली. यामध्ये तीन मजुर गंभीर जखमी झाले असून त्यापैकी एका मजुराचे पोट फाटल्याने त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यास योग्य उपचारासाठी नागपूरला हलविण्यात आल्याची माहिती आहे. या स्फोटामुळे इमारतीच्या भिंतीला भगदाड पडले असून जवळच लगून असलेल्या विद्युत खांबाचे तार तुटून पडले. संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सविस्तर असे की, शहरातील मुर्री रोडवरील बाजपेयी वॉर्ड परिसरात हरिश इंद्रकुमार गोलानी यांचा विजय मार्केटिंग या नावाने फर्निचरचा कारखाना आहे. या ठिकाणी फर्निचर तयार केले जातात. दरम्यान नेहमीप्रमाणे आजही कारखान्यातील मजूर कामात व्यस्त होते. यावेळी सायंकाळी ५ : १० वाजताच्या सुमारास जवळच ठेवण्यात आलेल्या केमिकलच्या ड्रममध्ये अचानक स्फोट घडून आला. त्यामध्ये लागूनच काम करत असलेले तीन मजूर गंभीर जखमी झाले.तीव्रता २ कि.मी. पर्यंत अनुभवास आली. तर कारखान्याचे काम इमारतीच्या तिसèया माळ्यावर सुरू असतांना हा स्फोट झाला. ज्यामुळे इमारतीच्या qभतीला मोठे भगदाड पडले असून त्याचा मलबा जवळच लागुन असलेल्या विजय भिमटे यांच्या घरावर पडल्या त्यांच्या घराचे छत कोसळून भिमटे यांचे घरी भाड्याने राहत असलेले इब्राहिम शेख यांची मुलगी शबीना परविन डोक्यावर घराचा छत पडल्यामुळे जखमी झाली.तर या स्फोटामुळे इमारतीसमोरील ३३ केव्ही विद्युत खांबाचे विजेचे तार तुटून पडले असून संपूर्ण परिसरातील विद्युत पुरवठा खंडीत झाला आहे. दरम्यान घटनेची माहिती संपूर्ण शहरात वाèयासारखी पसरली असून घटनास्थळावर बघ्यांनी एकच गर्दी केली होती.