रास गरबा कार्यक्रमाला अभिनेत्री तेजस्विनी पंडितची भेट!

0
11

गोंदियाः,दि.२०- स्थानिक पवार सांस्कृतिक भवन कन्हारटोली येथे पवार नवरात्र उत्सव समितीच्यावतीने आयोेजित रास गरबा कार्यक्रमाला मी qसधूताई सपकाळ फेम मराठी चित्रपट अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने भेट देवून आयोजकांचा तसेच पोवार समाजाचा उत्साह वाढविला.
या प्रसंगी मध्यप्रदेशचे आमदार मधू भगत,तिरोडाचे आमदार विजय रहांगडाले, जि.प.सभापती पी.जी.कटरे, माजी जि.प.अध्यक्ष नेतरामभाऊ कटरे,जि.प.चे माजी सदस्य संजय टेंभरे,पवार प्रगतीशील मंंचचे अध्यक्ष डॉ.कैलाश हरिणखेडे, प्रा.संजीव रहांगडाले,राजाभोज स्मारक समितीचे अध्यक्ष गुलाबभाऊ बोपचे,पोवार प्रगतीशील शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजेश चौहान,नगर सेविका मृदला बिसेन,उपसभापती धनलाल ठाकरे,बालाघाटचे जि.प.सदस्य प्रवीण बिसेन,कु.मोसम बिसेन,अ‍ॅड.पृथ्वीराज चव्हाण व समाज संघटनेचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने सन्मानित तेजस्विनी पंडित यांनी या प्रसंगी बोलतांना गोंदियाची सुन या नात्याने पोवार समाजाला जवळून बघण्याची माझी इच्छा या कार्यक्रमाच्या माध्यमातून पूर्ण झाल्याची सांगून कुडवा येथील रामेश्वरजी बोपचे यांची सुन असल्याचा परिचय तिने स्वतः करून दिला तसेच नवरात्रच्या निमित्ताने पवार समाजाच्या युुवकांनी केलेल्या या कार्यक्रमाची प्रंशसा करतांना या रास गरबाच्या निमित्ताने पवार समाजाने राष्ट्रीय एकात्मता साधन्याचे प्रतिपादीत केले.तसेच रास गरबा नृत्यात सहभागी होवून सर्वांचा उत्साह वाढविला.
नवरात्र उत्सव समितीचे संदीप बघेले,पंकज पटले,कुणाल बिसेन,बाबा बिसेन,गौरव तुरकर,योगेश ठाकरे,प्रतिक रहांगडाले,जलज येळे,दिपङ्क देशमुख,केतन तुरकर,राहुल बिसेन,दुर्गेश रहांगडाले,पवार प्रगतीशील मंंचचे सचिव डॉ.संजीव रहांगडाले,सुरेश पटले,प्रा.किशोर भगत,आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.