भूमिपूजनासाठी एका लोकप्रतिनिधींनी थांबविले उपकेंद्राचे बांधकाम

0
9

गोंदिया दि.२०– गोंदिया तालुक्यातील कुडवा जिल्हा परिषद क्षेत्रांतर्गत कुडवा येथे गेल्या तीन वर्षांपासून मंजूर असलेल्या प्राथामिक आरोग्य उपकेंद्राच्या बांधकामाला निव्वड आपल्या हातून भूमिपूजन न झाल्याच्या कारणास्तव एका लोकप्रतिनिधीने ते बांधकामच थांबविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सदर आरोग्य उपकेंद्र मंजूर करण्यासाठी तत्कालीन राष्ट्रवादीचे जि.प.सदस्य बाळकृष्ण पटले यांनी प्रयत्न केले. त्या प्रयत्नाला यश आले. आणि उपकेंद्र मंजूर होऊन केंद्र सरकारच्या राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान योजने अंतर्गत ४७ लाख रुपयाचा निधी बांधकामासाठी मंजूर झाला. त्या कामाची निविदा मार्च २०१५ मध्ये काढण्यात आली. त्यावेळी असाटी नामक कंत्राटदाराने २२ टक्के बिलोमध्ये हे कंत्राट स्वीकारले. त्यानंतर जागेचा प्रश्न निर्माण झाला. परंतु ज्या लोकप्रतिनिधीने आपल्या हातून भूमिपूजन का केले नाही म्हणून बांधकाम थांबविले. त्या लोकप्रतिनिधीने मात्र आरोग्य उपकेंद्राच्या जागेसाठी कुठलेही प्रयत्न केले नाही.
जुलै २०१५ मध्ये जिल्हा परिषदेच्या कुडवा गटातून निवडून आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जि.प.सदस्या खुशबू जितेश टेंभरे यांनी पहिल्याच आरोग्य समितीत विषय उपस्थित करून लक्ष वेधले. तेव्हा जागेची अडचण त्यांच्यासमोर ठेवण्यात आली. श्रीमती टेंभरे यांनी स्वत: पुढाकार घेत कुडवा ग्रामपंचायतच्या सर्व पदाधिकाèयांना विश्वासात घेऊन उपकेंद्रासाठी जागा मंजूर करवून घेतली. ज्या ठिकाणी जागा मंजूर करण्यात आली. त्या जागेची मोजणी जागेकडे जाण्यासाठी नसलेला रस्ता शेजारी ले-आऊट धारक मालकांशी चर्चा करून उपलब्ध करून दिला. या सर्व कामासाठी सतत दोन महिने श्रीमती टेंभरे यांनी ग्रामपंचायतच्या सहकार्याने सर्व कार्य पार पाडले. त्यानंतर त्या जागेवर उपकेंद्र तयार करण्याची आरोग्य विभागाला मागणी केली. त्यावर सदर जागेवर तत्काळ बांधकाम करण्याचे निर्देश कंत्राटदाराला दिले.
कंत्राटदारानेही ग्राम पंचायत पदाधिकाèयांच्या हस्ते नारळ फोडून कामाला सुरुवात केली. इमारतीच्या कॉलमकरिता लागणारे सर्व खड्डे खोदण्यात आले. आणि कामाला सुरुवात झाली. कामाला सुरुवात होताच येथील एका भूमिपूजन कार्यक्रमासाठी लोकप्रिय असलेल्या लोकप्रनिधीच्या पोटात दुखू लागले. आणि त्यांनी आरोग्य विभागाच्या संबंधित कर्मचारी अधिकाèयांना आपल्या निवासस्थानी बोलावून दमदाटी करीत सदर बांधकाम बंद करण्याचे निर्देश दिले.
वास्तविक सदर बांधकाम केंद्र सरकारच्या निधीतून होत असून जनतेच्या सोईसाठी हे उपकेंद्र महत्त्वाचे ठरणार होते. परंतु निव्वड आपल्या हातून भूमिपूजन न झाल्याचा कांगावा करीत विकासकामात अडथडा आणणाèया एका लोकप्रतिनिधीमुळे कुडव्याचे उपकेंद्र अडगडीत पडले आहे. जि.प.सदस्या टेंभरे यांनी कुडवा जि.प. क्षेत्राच्या विकासात अशाप्रकारे अडथडे निर्माण करून जनतेला विकासापासून रोखण्याचे काम काही लोकप्रतिनिधी करीत असल्याचा आरोप ही केला आहे.