अदानी फाऊंडेशनतर्फे ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ शिबिर

0
12

तिरोडा दि. २८: अदानी फाऊंडेशन तिरोडा हे ग्रामीण भागात विविध विकासात्मक दृष्टिकोनातून कार्यक्रम राबविते. येथे आर्ट ऑफ लिव्हिंग या कार्यक्रमाच्या आठ दिवसीय शिबिराचा उद्घाटकीय कार्यक्रम पार पडला.
अदानी पॉवर महाराष्ट्र लिमिटेड तिरोडाच्या आवारात चायना कॉलनी सभागृहात २६ नोव्हेंबर ते ३डिसेंबरपर्यंत निवासी स्वरुपात नि:शुल्क हे शिबिर घेण्यात येत आहे. या शिबिराला प्रशिक्षक व्यंकटेश मंगलराम व अशोक नानोटकर उपस्थित होते. तसेच अदानी पॉवर तिरोडा येथील अप्रेन्टीशिप करणारे युवक आणि शासकीय आयटीआय तिरोडा येथील एकूण ४0 युवकांनी प्रशिक्षणामध्ये सहभागी होऊन प्रशिक्षणाचा लाभ घेत आहेत.
अध्यक्षीय भाषणात सी.पी. शाहू यांनी या शिबिरामध्ये सहभागी युवकांमध्ये व्यासपीठ कौशल्य निर्माण झाल्याचे आनंद व्यक्त करीत रविशंकर महाराज यांच्या छत्रछायेखाली युवकांना जे काही शिकायला मिळत आहे, या गुणांचा वापर करावा. आपण गावागावात बालक तसेच युवकांचे प्रशिक्षण घ्यावे. यामधून त्यांच्यामध्ये नेतृत्व विकास होईल व यातून गावविकास साध्य करता येईल, असे ते म्हणाले.
अदानी फाऊंडेशनचे प्रकल्प समन्वयक सुबोधकुमार सिंग यांनी, अदनी फाऊंडेशन तिरोडा हे युवकांच्या विकासाकरिता विविध कार्यक्रम राबवित असल्याचे सांगून या कार्यक्रमामागचा मुख्य उद्देश व्यक्तीत्व विकास, नेतृत्व विकास असल्याचे सांगितले. प्रशिक्षक व्यंकटेश यांनी ‘वसुदेव कुटुंबकम्’ याला अनुरुप आपण सारे एका परिवाराचे सदस्य आहोत. बियापासून वृक्ष तसाच आपल्या मानव जातीचे आहे.
संचालन रोहित अग्रवाल यांनी केले. आभार रूपेश पटले यांनी मानले. कार्यक्रमासाठी डॉ. विजय गंदेवार, राजकुमार मोरे, कैलाश रेवतकर, व चमूने सहकार्य केले.