विदेशी पक्ष्यांनी गजबजू लागले जिल्ह्यातले पाणवटे

0
13

गोंदिया,दि.7-हिवाळ्याची चाहूल लागताच आणि या काळात मूळच्याठिकाणी बर्पवृष्टी अधिक होत असल्याने त्याकाळात हवे असलेले अन्न मिळण्यास होत असलेली अडचणीसोबतच पोषक वातावरण पक्ष्यांच्या स्थलातंराणासाठी मुख्य कारण होय.गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील तलावांच्या पाणवठ्यावर मिळणाèया हिरवळीतील खाद्य हे बहुतेक विदेशी पक्ष्यांचे मुख्य आकर्षणाचे खाद्य असते,या कारणामुळेच गेल्या अनेक वर्षापासून विदेशी पक्ष्यांचे आगमन जिल्ह्यात होत असते.अशाच काही विदेशी प क्ष्यांनी जिल्ह्यातील परसवाडा,श्रृगांरवन,नवेगावबांध,मालीजुंगा,सिरेगावबांधसारख्या तलावावर हजारोच्या संख्येने विदेशी पक्ष्यांचे आगमन झाल्याचे चित्र बघावयास मिळते.हे वन्यप्रेमीसोबत पक्षिप्रेमी वन्यजीव प्रेमींसाठी आकर्षणाचे केंद्र असते.या पक्ष्यांना बघण्यासाठी पहाटेपासूनच पक्षिप्रेमी जाऊ लागले असून नुकतेच गेल्या आठवड्यात प्रसिद्ध मराठी कलावंत गिरीश ओक यांनीही गोंदिया तालुक्यातील परसवाड्याचा तलावावर जाऊन विदेशी पक्षी ग्रे ले ग्युजसह अनेक पक्ष्यांचे दर्शन घेतले.
नवेगावबांधचे तलाव एकेकाळी या पक्ष्यासांठी महत्त्वाचे केंद्र होते परंतु तेथे मानवी हस्तक्षेप अधिक वाढल्याने काही प्रमाणात ती संख्या कमी होऊन या पक्ष्यांनी काही नवी स्थळे शोधून काढली.त्यामध्ये परसवाडा सारख्या तलावाचे स्थळ यात येतात.
गोंदिया जिल्ह्यात ग्रे लेक ग्युज,रेड हेडेड टोर्चर,कॉमन केल,पहिल्यांदाच आलेला डोमेसियल क्रेन,ब्लॅक हेडेड गल,ग्रे वॅगटेल सारखे अनेक विदेशी पक्षी हजारोच्या संख्येत आले असून पुन्हा याच संख्येत काही पक्षी या महिन्यात पोचण्याची शक्यता पक्षिमित्र त्र्यंबक जरोदे यांनी बेरार टाईम्सजवळ व्यक्त केली.
उत्तर गोलार्धात होणाèया बर्फवृष्टीच्या काळात हे पक्षी उष्णभागाकडे मुख्यत्वे स्थलातंर करतात.त्यातच या पक्ष्यासोबतच गोंदिया जिल्ह्यातील सारस पक्षी सुध्दा महत्त्वाचे ठरले आहे.या जिल्ह्याला लागूनच असलेल्या बालाघाटच्या भागात सुध्दा सारस पक्षी मोठ्या प्रमाणात हट्टा या गावाकडे बघावयास मिळू लागले आहेत.
या पक्ष्यांच्या आगमनानंतर पक्ष्यांची शिकार होऊ नये यासाठी गोंदियाच्या हिरवळ या संस्थेच्या वतीने विशेष करून ज्या तलावानजीक हे पक्षी आले आहेत,त्या भागात करडी नजर त्या पक्ष्यांना बघण्यासाठी येत असलेल्या नागरिकावर संस्थेचे त्र्यंबक जरोदे,रुपेश qनबार्ते,रवी गोलानी,नरेंद्र काळे,दुर्गेश दमाहे आदी नजर ठेवून त्या पक्ष्यांच्या सर्वधंनासाठी कार्य करीत आहेत.