तहसील कार्यालयावर राष्ट्रवादीचा धडक मोर्चा

0
9

सालेकसा,दि. ७ : तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्यात यावा, यासह इतर मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सोमवारी (दि. ७) तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात पाचशेच्या वर शेतकèयांनी सहभाग घेतला होता. या मोर्चाचे नेतृत्व माजी आ‘दार दिलीप बनसोड यांनी केले.
सालेकसा तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्यात यावा, शेतकèयांना एकरी सरसकट ‘दत करण्यात यावी, बोनस जाहीर करण्यात यावा, शेतकèयांचा सातबारा कोरा करण्यात यावा, कृषी वीजबील माफ करण्यात यावे, वीज बिलाचे दर कमी करण्यात यावे, नुकसानग्रस्त शेतकèयांना आर्थिक मदत देण्यात यावी, धानाच्या आधारभूत किमतीत वाढ करण्यात यावी यासह इतर मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला.
या मोर्चात ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष बबलू कटरे, जिल्हा परिषद सदस्य दुर्गा तिराले, सालेकसा पंचायत समितीचे उपसभापती राजकुमारी विश्वकर्मा, प्रभाकर दोनोडे, साखरे, मनोज शरणागत, टिकाराम कोहरे, सुरेश हर्षे, सुखराम फुडे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले.