नक्षल कारवायात घट, परंतु आदिवासींचा विकास मात्र जैसे थे

0
10

 

खेमेंद्र कटरे
गोंदिया, दि .१७-महाराष्ट्रात गोंदिया जिल्ह्यचाही नक्षल जिल्ह्यात समावेश आहे.गेल्या काही वर्षातील घडामोडीकडे बघितल्यास २०१० पुर्वी जी परिस्थिती होती.ती आता राहिलेली नाही.१९९० – २०१० या दोन दशकामध्येच जिल्ह्यातील काही भाग नक्षलकारवायांनी भेदला गेला होता.परंतु त्यानंतरच्या काळात घटलेल्या कारवाया. आणि गेल्या काही वर्षापासून ज्यापध्दतीने गोंदिया पोलिसांनी ८ ते १० नक्षल्यांनी पकडून त्यांच्याकडून साहित्य जप्त केले.त्यासोबतच सर्चींगच्या वेळी जंगलातील त्यांच्या साहित्यानां ताब्यात घेतले यावरुन रेस्टझोन सुध्दा नक्षल्यासांठी डेंजर झोन ठरु लागला आहे. २०१३ मध्ये १ व २०१४ या वर्षात ३ नक्षलवाद्यांनी गोंदिया पोलिसाकडे आत्मसर्मपण केले.तर याच वर्षांत गुप्त माहितीच्या आधारे काहींना पकडले.या सर्वांचा विचार केल्यास गोंदिया जिल्ह्यातून नक्षल कारवायामध्ये सातत्याने घट होत असल्याने आदिवासींचा विकास होऊ लागला का हा सुध्दा एक प्रश्न आहे.
नक्षल कारवाया जर कमी होऊ लागल्या याचा अर्थ आदिवासीपर्यंत शासनाच्या योजना पोचू लागल्या काय.पोचू लागल्या तर गेल्या चार पाच वर्षात त्यांच्या विकास झाला काय असे अनेक प्रश्न सुध्दा उपस्थित होऊ लागले आहेत.जर त्यांच्यापर्यंत शासनाच्या योजना पोचल्या असतील तर आजच्या घडीला आदिवासी गावपाड्यात गेल्यावर जे चित्र बघावयास मिळते त्यावरुन अद्यापही त्यांचा विकास झालेला दिसून येत नाही.कडीकसा,ककोडी,मुरकूटडोह दंडारी सारख्या अतिदुर्गम भागात आजही जायला रस्ते नाहीत.पोलिसांनाही २-३ किमी अंतर पायी जंगलातून तुडवत पहाडावरील पाड्यावर जावे लागते.आजही त्याठिकाणी रेशनचा अन्न पोचलेला नाही.त्यांच्या शेतात आदिवासी विभागाने दिलेला पंप किंवा नांगर दिसत नाही.आजही अतिदुर्गमभागातील शाळेत शिक्षक पोचतच नाही अशी अवस्था असतांना नक्षलग्रस्त भागाच्या नावावर आलेल्या शासकीय योजनेच्या निधीतून विकास कुणाचा झाला.याचा शोध घेऊन शासनाने वेळीच आदिवासींच्या विकासासाठी दखल घेणे टाळले तर पुन्हा नक्षलघडामोडीपासून शांत दिसत असलेल्या जिल्ह्यात नक्षली आपले बस्तान पुन्हा मांडणार नाही असे परिसरातील जिल्ह्यात सुरु असलेल्या नक्षल्याच्या कारवायावरुन दिसून येते.
त्यावेळी चिचगड,ककोडी,दरेकसा,कडीकसा,मुरकुटडोहसारख्या अतिदुर्गम गावातील नागरिकांच्या मनात दहशत निर्माण करुनच नव्हे तर त्यांना शासनाने तुमची फसवणुक केल्याचे सांगत त्यांच्या मनात शासनाप्रती असंतोष निर्माण करुन आदिवासींना नक्षल्यांनी आपल्यासोबत घेतले होते हे वास्तव.परंतु पोलिस प्रशासन आणि जिल्हाप्रशासनाने आपल्या कसबीने जिल्ह्यातील नक्षलचळवळीनवर अंकुश ठेवण्याचा सातत्याने केलेला प्रयत्न आणि मधल्या काळात निर्णयक्षमता घेणारे पोलिस अधिक्षक लाभल्याने जंगलव्याप्त भागात शिरुन नक्षल्यांच्या कारवायांनाही थेट आव्हान देण्याचे काम झाल्याने नक्षल्यांनीही या भागातून हळूहळू काढता पाय घेतला.मध्यप्रदेश,छत्तीसगडला जिल्ह्याची सीमा लागून असल्याने आजच्या घडीला नक्षल्यानी गोंदिया जिल्ह्यातील सीमेला आपला रेस्टझोन ठरवून इतर भागात कारवाया करण्यासाठी मार्ग निवडला आहे.गेल्या दशकभराचा विचार केल्यास नक्षल्यानी कारवाया करण्यासाठी अनेकदा प्रयत्न केले.परंतु आदिवासींचा विश्वास संपादन करण्यात मधल्या काळात पोलिसांना आलेल्या यशामुळेच नक्षल्यांचे अनेक भुसुरंग असो की त्यांचे जंगलातील साहित्य हे हाती लागू शकले.विशेष गेल्या चार पाच वर्षात तर नक्षल घटना घडलेल्याच नाहीत उलट नक्षल्यांनी रेस्टझोन म्हणून निवडलेला हा भागच आज त्यांच्याविरोधात चालला की काय असे वाटू लागले आहे.