नाना पाटेकर @ ६५ वा वाढदिवस

0
13

मुंबई- सुप्रसिद्ध नाटक- सिने अभिनेते विश्वनाथ दिनकर पाटेकर ऊर्फ नाना पाटेकर यांचा ६५ वा वाढदिवस त्यांचाच प्रमूख भूमिका असलेला ‘नटसम्राट’ चित्रपट आज प्रदर्शित करुन साजरा होत आहे.

नानाने अनेक हिंदी व मराठी चित्रपटांत आणि नाटकांत भूमिका केल्या आहेत. नानाने नायक, सहनायक, खलनायक आणि चरित्रनायक अशा विविध भूमिका केल्या आहेत. नाना पाटेकर यांनी सप्टेंबर २०१५ मध्ये अभिनेते मकरंद अनासपुरे याच्याबरोबर ‘नाम फाउंडेशन’ या धर्मादाय संस्थेची स्थापना केली. या संस्थेअंतर्गत ते महाराष्ट्रातील दुष्काळी भागातील शेतक-यांना मदत करतात. आपल्या बिनधास्त, परखड आणि स्पष्ट बोलण्यामुळे नाना प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत बनला आहे. यावर्षी संजय मांजरेकर दिग्दर्शित ‘नटसम्राट’ हा चित्रपट नानाच्या वाढदिवसादिवशीच प्रदर्शित झाल्याने नानाचा वाढदिवस खास ठरला आहे.

नाना पाटेकर यांचा जन्म १ जानेवारी १९५१ रोजी मुरुड-जंजिरा येथे झाला. वडील चित्रकार होते. नाना मुंबईतील जे. जे. स्कूल ऑफ आर्टचे विद्यार्थी आहेत. नानांना स्केचेस बनवण्याचा छंद होता. गुन्हेगारांच्या वर्णनावरून नानांनी त्यांची रेखाचित्रे तयार करून दिली आहेत. या कलाशिक्षणाच्या काळात नाना कॉलेजच्या नाटकांत कामे करू लागले. पुढे व्यावसायिक रंगभूमीही त्यांनी गाजवली.