पोलिस स्टेशन हवे असेल तर गुन्हेगारी वाढवा – राम शिंदे

0
14
कर्जत, दि.१ – नवीन पोलीस स्टेशन हवे असतील तर आपल्याला गुन्हेगारी वाढवायचे काम हाती घ्यावे लागेल असे वादग्रस्त विधान राज्याचे गृहराज्यमंत्री ना. प्रा. राम शिंदे यांनी केले. आणि पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहेत. शिंदे आज कर्जत येथे पोलीस स्टेशनच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. त्यावेळी समोर जमसमुदाय होता तरी त्यांना बोलताना आपले शब्द आवरता आले नाहीत.
गुन्हेगारीचा दर जर कमी असेल तर नवीन पोलीस स्टेशन मंजूर करता येत नाहीत, अशी माहिती देऊन आपण एक वर्ष गृहराज्यमंत्री असल्याने आपल्याला सर्व बाबी माहिती आहे, असेही ते म्हणाले. यावेळी मंचावर गृह मंत्रालयाचे अतिरिक्त गृह सचिव के. पी. बक्षी, अतिरिक्त महासंचालक राजेंद्र सिंह, जिल्हाधिकारी अनिल कवडे, पोलीस अधीक्षक सौरभ त्रिपाठी यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.