महिलेने दिला एकाच वेळी चार बाळांना जन्म!

0
9

गोंदिया दि.३: ‘उपरवाला जब भी देता, देता छप्पर फाडके’ या म्हणीची व गाण्याची आठवण करून देणारी घटना गंगाबाई रुग्णालयात घडली. छोटा गोंदिया निवासी एका महिलेने नववर्षांच्या पहिल्याच दिवशी एक-दोन नव्हे तर तब्बल चार बाळांना जन्म दिला. विशेष म्हणजे येथील बाई गंगाबाई सरकारी महिला रूग्णालयात या महिलेची नॉर्मल डिलिव्हरी करण्यात आली असून माता व बाळ सुखरूप आहेत.येथील छोटा गोंदिया निवासी भूमेश्वरी संदीप मंडल (२३) यांच्या प्रसुतीची वेळ आल्याने त्या खाजगी डॉक्टरकडे गेल्या होत्या. डॉक्टरांनी त्यांच्या पोटात तीन बाळ असल्याने व त्यांचा रक्तदाब वाढल्याने त्यांना बाई गंगाबाई रूग्णालयात रेफर केले. त्यानुसार, गुरूवारी (दि.३१) सायंकाळी ७.३० वाजता त्यांना बाई गंगाबाई रूग्णालयात भरती करण्यात आले. शुक्रवारी (दि.१) नववर्षाच्या पहिल्याच दिवशी भूमेश्वरी यांची डॉ.सायस केंद्रे व परिचारीका श्रृष्टी मुरकूटे यांनी नॉर्मल डिलिव्हरी करून चार बाळांना जग दाखविले.