प्रत्येक मुलीचे सुकन्या समृद्धी योजनेत खाते असावे- रहांगडाले

0
17

भाजप महिला मोर्चातर्फे सावित्रीबाई फुले जयंती
गोंदिया,दि. ७ – : पंतप्रधान नरेंद्री मोदी यांनी मुलींच्या उज्वल भविष्यासाठी तसेच आर्थिक, सामाजिक विकासाकरीता सुकन्या समृद्घी योजना आणली आहे. या योजनेच्या माध्यमातून दहा वर्षाखालील मुलीचे खाते उघडून शासनाच्या या योजनेचा लाभ घेता येईल. भाजप महिला मोर्चातर्फे समाजातील अनेक गरजू कुटुंबातील मुलींचे खाते उघडण्याचे कार्य व जनजागृती करण्यात येत आहे. जिल्ह्यातील प्रत्येक मुलीचे सुकन्या समृद्धी योजनेत खाते असावे हा या मागचा उद्देश असल्याचे, प्रतिपादन महिला मोर्चा प्रदेश सचिव सीता रहांगडाले यांनी केले.
त्या येथील राईस मिल असोसिएशन सभागृहात आयोजित सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त ‘बेटी बचाओ, बेटी पढाओङ्क अभियान या कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या. कार्यक्रमाची सुरूवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या छायाचित्राला माल्यार्पण व दिप प्रज्वलन करून करण्यात आली. याप्रसंगी अनेक मुलींचे पोस्ट आफीसमध्ये खाते उघडून जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांच्या हस्ते त्याचे वाटप करून सुकन्या समृद्धी योजनेचे शुभारंभ करण्यात आले. दरम्यान, जिल्हाध्यक्ष अग्रवाल यांनी केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची सविस्तर माहिती देवून त्यांचा जनतेच्या कल्याणार्थ प्रचार-प्रसार करण्याचे आवाहन उपस्थितांना केले. यावेळी प्रामुख्याने जि. प.चे कृषी व पशुसंवर्धन सभापती छायाताई दसरे, समाज कल्याण सभापती देवराव वडगाये, महिला मोर्चा प्रदेश सदस्य चंदा शर्मा, नगरसेविका भावना कदम, सविता ईसरका, देवरी पं. स. सभापती देवकी मरई, महामंत्री प्रतीभा परिहार, शालिनी डोंगरे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष संजय कुलकर्णी, जि. प. सदस्य रोहिनी वरखडे, शीला चव्हाण, सरिता रहांगडाले, मंदा कुंभरे, शैलजा सोनवाने, कमला पाउलझगडे, माधुरी पातोडे, नगरसेविका प्रमिला qसद्रामे, श्रद्धा अग्रवाल, मैथुला बिसेन, शोभा चाधरी, शशी फुंडे, तालुका अध्यक्ष गायत्री चौधरी, वनमाला डहाके, गोमती तितराम, पं. स. सदस्य रानी रहांगडाले, माधुरी टेंभरे, जया डोये, ममता वाढवे, कल्याणी कटरे, प्रभा घरजारे, शशीकला मेश्राम, संध्या भरणे, रजनी काटकर, अंजली जांभुळकर, कौसल्या कुंभरे, भुमीका येडे, पुष्पा खोटेले, सुनंदा उके, सुनिता चौबे आदी उपस्थित होते. यावेळी पोस्ट ऑफीसच्या अधिकाèयांनी पंतप्रधान सुकन्या समृद्धी योजनेची संपूर्ण माहिती समजवून सांगितली. यावेळी मोठ्या संख्येत भाजप महिला मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकत्र्या उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे संचालन चित्रकला चौधरी यांनी तर आभार प्रतीभा परिहार यांनी मानले.