सारस फेस्टीवलतर्गंतच्या छायाचित्रस्पर्धेला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद

0
6

गोंदिया दि.९:-सारस फेस्टीवलतंर्गत आज गोंदिया जिल्हा पर्यटन समिती तसेच वन्यजीव संस्थांच्या सहर्कायाने सुभाष बागेत शाळकरी मुलांसाठी सारस पक्षी बचाव संदेशातर्गंत छायाचित्र स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. राज्यात गोंदिया जिल्ह्यात सारस पक्षी पाहायला मिळतो. या पक्ष्याची ओळख गोंदियाची ओळख ठरावी यासाठी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.विशेष म्हणजे या महोत्सवामध्ये येथील विमानतळ प्राधिकरणासह ताज गुप्रच्या हॉटेल गेटवेनेही सहभाग घेतला आहे.

१५ डिसेंबर २०१५ ते ३१ जानेवारी दरम्यान पहिल्यांदाच सारस महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सारस पक्षाचे संवर्धन व्हावे यासाठी जनजागृती करण्याकरिता विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने आज चित्रकला स्पर्धेचे आयोजन सुभाष गार्डन परिसरात करण्यात आले होते. यात प्रोग्रेसिव्ह हायस्कुल,विवेक मंदीर,दिल्ली पब्लीक स्कुल,डीबीएम स्कुल,सेंट झेवियरसह शहरातील विविध शाळेतील हजारोंच्यावर विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला.सारस पक्ष्याचे संवर्धन व्हावे यासाठी सुरेख असे चित्र काढले. जिल्हाधिकारी डाॅ.विजय सुर्यवंशी यांनी स्पधेला भेट देऊन विद्यार्थांना प्रोत्साहित केले.आयोजनासाठी त्र्यबंक जरोदे,सावन बहेकार,रुपेश निबार्ते,मुकुंद धुर्वे,मुनेश गौतम,वन व वन्यजीव विभागाचे अधिकारी यांच्यासह वन्यप्रेमीनी सहर्काय केले. विद्यार्थ्यांनी तयार केलेले चित्रांचे सारस महोत्सव समारोह कार्यक्रमात पोस्टर प्रदर्शन भरविण्यात येणार आहे