शेतकरी संघटनेच्या कार्यकारिणीची औरंगाबादला बैठक

0
11

नागपूर दि. ९– शेतकरी संघटनेच्या विस्तारित कार्यकारिणीची बैठक येत्या 29 जानेवारीला औरंगाबाद येथे होणार आहे. शेतकरी संघटनेचे प्रणेते शरद जोशी यांच्या निधनानंतर होणारी कार्यकारिणीची ही पहिलीच बैठक आहे. शेतकरी संघटना ट्रस्टची बैठक गुरुवारी पुण्यात पार पडली. शेतकरी संघटनेचे आर्थिक व्यवहार पाहण्यासाठी शरद जोशी यांनी हा ट्रस्ट निर्माण केला होता. शेतकरी संघटना ट्रस्टचे अध्यक्ष रवी काशीकर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. यात शेतकरी संघटनेची विस्तारित कार्यकारिणी घेण्याचा निर्णय घेण्यात आला. शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष गुणवंत पाटील हंगर्गेकर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारिणीची ही बैठक होणार आहे.