तिरोडयात सिंधुताई सपकाळ 28 फेब्रुवारीला

0
13
तिरोडा-दि.18-अनाथाच्या उद्धारासाठी अन् कल्याणासाठी झटत आयुष्य घालविणा-या देव स्र्वपीनी राष्टपती पुरूस्कार प्राप्त थोर समाजसेविका सौ. सिंधुताई सपकाळ उर्फ माई यांचे ‘आत्मकथन’ कार्यक्रमाचे आयोजन तिरोडयातील उत्तर बुनियादी जिल्हा परिषद शाळा-शहिद मिश्रा ग्राउंड येथे 28 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजता आयोजिलेले आहे. सदर कार्यक्रमाचे आयोजन युवा महिला संघटना, महिला समुपदेशन केंद्र तिरोडा या संस्थेद्वारे आयेाजित करण्यात आले आहे. या प्रसंगी निराधारांना आधार अन् आयुष्य जगण्याची आशा पल्लवित करणा-या व आपल्या अंतिम श्वासापर्यंत समाजसेवेचे व्रत स्विकारणा-या थोर सामाजिक कार्यकत्र्या सौ. सिंधुताई सपकाळ यांचे ‘भुक मला बोलायला लावते………………. या आत्मकथनाचे आयोजन करण्यात आले आहे.
या प्रसंगी मोठ्या  संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन युवा महिला संघटना ,महिला समुपदेशन केंद्र तिरोडा चे अध्यक्षा सौ. ममता आनंद बैस, उपाध्यक्षा मंदाताई नत्थुजी गाढवे, सरचिटणीस माधुरी राजेंद्र रहांगडाले, सहसचिव सौ. प्रिती प्रकाश पुडके, कोषाध्यक्ष रूबीना मोतीवाला, सहकोषाध्यक्षा सौ. राणी महेश बालकोटे ,नगरसेविका सौ. राखी गुणेरिया, अर्चना जायसवाल, ज्योत्सना शेंडे, पुजा उरकुडे, छाया कटरे, राजश्री उपवंशी, शाहीन मिर्झा, ममता हट्टेवार यांनी केले आहे.