सालईखुर्द ते नेरला रस्त्यासाठी जनआंदोलनाचा ईशारा

0
13

तुमसर : सालईखुर्द ते नेरला आंधळगाव रस्त्याची दुर्दशा झाली असून अनेकदा संबंधीत विभागाला निवेदन देवूनही रस्त्याची दुरूस्ती होत नसून येत्या आठ दिवसाच्या आत खडीकरणास सुरूवात न झाल्यास जनआंदोलन करण्याचा ईशारा सालईखुर्द वासीयांनी केला आहे.
सालईखुर्द ते नेरला आंधळगाव रस्ता सरळ आंधळगाव बाजारपेठेत जुडते, या बाजारपेठेला शेतकर्‍यांच्या दृष्टीने महत्व आहे. यासाठी सालई ते नेरला हा मार्ग दळणवळणासाठी शुलभ नाही. रस्त्यात खड्डे, रस्ता तुटलेला, पावसाळ्यात चिखलाने माखलेला. त्यामुळे रहदारी करणार्‍यांना तारेवरची कसरत करावी लागते.
उपविभाग तुमसर कार्यालय २ डिसेंबर २0१३ ला व जि.प. भंडारा कार्यालयाला २0 डिसेंबर २0१३ ला दिलेल्या निवेदनात कळविले होते. या तारखेपासून सतत निवेदन व तोंडी कळविले होते. परंतु त्या निवेदनाची मागणी रास्त समजून खडीकरण कामाचा प्रस्ताव जि.प. बांधकाम विभाग भंडाराला पाठविण्यात आले होते.
त्या रस्त्याचा दर्जा इजिमा ३४२/५00 मिटर २५ लाख रूपयांचा आहे तरी जिल्हा नियोजन समितीच्या सभेत किंवा विशेष निधीतून मंजूर करून प्रगतीच्या कामाची सुरूवात करा अन्यथा जनआंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ता नितीन लिल्हारे यांच्या नेतृत्वात उपविभाग अभियंताला निवेदन देण्यात आले. यावेळी रवि पटले, ईश्‍वर दमाहे, राजु सव्वालाखे, प्रविण लिल्हारे, ईश्‍वर लिल्हारे, शैलेश लिल्हारे, जितेंद्र लिल्हारे, महेंद्र सव्वालाखे, संदीप पटले उपस्थित होते.