अनंत पुण्यामुळेच ज्ञानी पंच परमेष्ठीच्या दर्शनाचा भाव जागतो

0
13

गोंदिया : साखर काय गोडवा देईल, कुणी कुणाचे नाव घ्या तर तो खूप प्रसन्न होतो, साखरेपेक्षा तो अधिक गोडवा देतो. जो तुम्हाला काषाय रूप दिसत आहे, केवळ तुम्ही त्याचे प्रसन्नतेने नाम स्मरण करा, त्याची कषाय स्वत:च दूर होईल, असे मार्गदर्शन आचार्य विशुद्ध सागर यांनी केले.
ते दिगंबर जैन मंदिरात प्रवचन देत होते. आचार्य विशुद्ध सागर यांचे आपल्या संघातील मुनिंसह गोंदियात आगमन झाले. धर्मप्रेमी बांधव व नागरिकांनी त्यांचे दर्शन करून श्रीफळ अर्पण करून आशीर्वाद घेतले. जनक गुप्ता यांनी मुनिंचे पाद प्रक्षालन केले. त्यांच्या आगमनानिमित्त शोभायात्रा काढण्यात आली. ही शोभायात्रा ओव्हरब्रिज, नेहरू चौक, गांधी चौक, गोरेलाल चौक या मार्गांनी जैन मंदिरात पोहोचली.तेथे परंपरागत पद्धतीने आरती करण्यात आली. यानंतर दरदिवशी सकाळी ८.३0 ते दुपारी ३.३0 पर्यंत त्यांचे प्रवचन होत आहे.
आचार्य विशुद्ध सागर पुढे म्हणाले, सूर्य कितीही उंच असो तरी खाली कितीही ओलावा असला तरी तो वाळून जातो. अशाचप्रकारे जिनदेवरूपी सुरीच्या नाममात्राने पापरूपी किचड आपोआप नष्ट होतो. ज्याप्रकारे तेलाच्या थेंबाने मशीनला लागलेली जंग वेगळी होते, त्याचप्रकारे ज्ञानी-अरिहंत यांच्या भक्तीच्या एका थेंबाने कर्मरूपी जंग आपोआप वेगळे होते. जेव्हा मन खराब होतो तेव्हा क्षेत्र बदलवून घ्यावे. संगतीच्या नियोगाने स्वभाव बदलतो. प्रास्ताविक दिगंबर जैन मंदिरचे ट्रस्टी आ. राजेंद्र जैन यांनी केले. नगर आगमनप्रसंगी आचार्य विशुद्ध सागर, त्यांचा संघ व समाजाचे ट्रस्टी आ. राजेंद्र जैन, विनोद जैन, सुकमाल जैन, अशोककुमार जैन, राजू एन. जैन, राजेश जैन, देवेंद्र अजमेरा, सुधीर जैन, सुनील जैन, निखिल जैन, दिलीप ठोल्या, अजयकुमार जैन, संतोष जैन, ज्ञानचंद जैन, रवी कासलीवाल, धर्मेंद्र जैन, नरेश जैन, संजय जैन, हरगोविंद चौरसिया, आनंद जैन, अमन पाटनी, मयंक जैन, आनंद दयानंद जैन, संदीप जैन, निर्मल दयानंद जैन, वसंत जैन, शशांक जैन, सुशांत जैन, रजत जैन, सुरेश जैन, सैंकी जैन, राहुल जैन, राजेश जैन, अनिल जैन, अजयकुमार जैन, देविन जैन, संदीप जैन, निरू निर्मल जैन, अक्षय जैन, अंकित पाटनी, कल्ली जैन, हिरेश जैन, धनेंद्र पांड्या, सोनू जैन, आशिक जैन, संकल्प जैन, क्षितिज जैन व मोठय़ा संख्येने महिलांचा सहभाग होता.