त्रुटी विरहीत अर्ज २८८ प्रकरणे मंजूर

0
14

गोरेगाव : स्थानिक तहसील अंतर्गत संजय गांधी निराधार योजना समिती गठित झाल्यानंतर प्रथमच तहसीलमधील राष्ट्रीय सहायता योजनेची (संजय गांधी निराधार योजना) २८८ प्रकरणे समितीने मंजूर केली.संजय गांधी निराधार योजनेत समाविष्ट असलेली श्रावण बाळ योजनेची ९१ प्रकरणे तर राष्ट्रीय वृध्दापकाळ योजनेची ९१प्रकरणे मंजूर करण्यात आली. संजय गांधी निराधार योजनामध्ये ९३ प्रकरणे मंजूर करण्यात आली. विधवा महिलांसाठी मदतीची ११प्रकरणे निकाली काढण्यात आली आहे.तर अपंगाची २प्रकरणे मंजूर करण्यात आली आहे. अशी एकूण २८८ प्रकरणे २२मार्च रोजी संजय गांधी निराधार योजना समिती अध्यक्षा सिता रहांगडाले सचिव, तहसीलदार कल्याणकुमार डहाट, सदस्या चित्रकला चौधरी, डॉ. लक्ष्मण भगत, आनंद कटरे, धनराज टेंभरे यांनी प्रत्यक्ष अर्जाची तपासणी करून त्रुटी विरहीत अर्ज २८८ प्रकरणे मंजूर केली. या वेळी अध्यक्ष सीता रहांगडाले, सचिव कल्याणकुमार डहाट यांनी तालुक्यातील सर्व अर्जांची तपासणी झाल्यानंतर त्रुटीविरहीत सर्व प्रकरणे त्वरित मंजूर करण्यात येईल, असे सांगितले.