जागतिक आरोग्य संघटनेतर्फे “सर्च” संस्थेला पब्लिक हेल्थ चॅम्पियन पुरस्कार प्रदान

0
15

गडचिरोली, -: जागतिक आरोग्य संघटनेने गडचिरोलीच्या “सर्च” संस्थेला “पब्लिक हेल्थ चॅम्पियन पुरस्कार” देऊन सन्मानित केले. आज ७ एप्रिल या जागतिक आरोग्य दिनी केंद्र सरकार व जागतिक आरोग्य संघटना यांच्या संयुक्त वतीने नवी दिल्लीतील हॉटेल हयात रिजन्सी येथे आयोजित शानदार समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

जागतिक आरोग्य संघटनेचे भारताचे प्रमूख डॉ.हेंक बेकेडॅम यांच्या हस्ते “सर्च” चे संचालक डॉ. अभय बंग यांनी हा पुरस्कार स्वीकारला. दीर्घ काळासाठी सातत्याने भारताचे सार्वजनिक आरोग्य सुधारण्यासाठी सेवा, संशोधन व राष्ट्रीय धोरण याबाबत महत्वाचे योगदान दिल्याबद्दल हा विशेष पुरस्कार होता. सर्चसोबतच “सुलभ इंटरनॅशनल”, “संगत” गोवा, “महान” मेळघाट व डॉ. दवे गुजरात संघटना या चार संस्थांना हा पुरस्कार मिळाला.