बाबासाहेबांच्या १२५ व्या जयंती महोत्सवाची जय्यत तयारी

0
12

भंडारा : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती महोत्सव निमित्त ९ ते १४ एप्रिलपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती समारोह समिती भंडारातर्फे शहरात करण्यात आले आहे.
यात ९ एप्रिलला सायंकाळी ७ वाजता दसरा मैदानावर पुज्य भंदत सदानंद महास्थवीर, भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई, भदंत शिलानंद महास्थविर, भंदत ज्ञानज्योती स्थविर आदी बौध्दभिक्खूंच्या उपस्थितीत महापरिमाणपाठ व धम्मदेसना, १0 ला सायंकाळी ६ वाजता दसरा मैदानात प्रसिध्द गायक व टी.व्ही. सिंगर छोटा मजीद शोला यांच्या सुगम संगीताची बहारदार मैफिल होईल. याप्रसंगी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या व्यक्ती, कार्यकर्ते व गुणवंतांचा सत्कार करण्यात येईल. यावेळी अध्यक्षस्थानी खासदार प्रफुल पटेल, प्रा. जोगेंद्र कवाडे, राजेंद्र गवई, धनंजय दलाल आदी मान्यवर उपस्थित राहतील. ११ एप्रिलला सायंकाळी .६.३0 वाजता सार्वजनिक वाचनालयाच्या ‘इंद्रराज सभागृहात’ ‘आजचे समाजवास्तव आणि ‘फुले-आंबेडकरी विचार’ या विषयावर प्रमुख वक्ते, कवी-लेखक आणि साहित्यचिंतक सतीश काळसेकर यांचे व्याख्यान होईल. अध्यक्षस्थानी सुप्रसिध्द कवी आणि विचारवंत डॉ. भालचंद्र जोशी तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी धीरजकुमार उपस्थित राहतील. संचालन डॉ. अनिल नितनवरे तर संयोजन अमृत बन्सोड करणार आहेत. याप्रसंगी अश्‍ववीर गजभिये लिखित ‘भारत गणराज्यांचे विधिवत नामकरण’ या ग्रंथाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात येईल. १२ एप्रिलला सकाळी १0 ते सायंकाळी ५ वाजतापर्यंत लालबहादूर शास्त्री कनिष्ठ महाविद्यालयात रक्तदान, रक्तगट, बालरोग, नेत्र व वैद्यकीय तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.