बौद्ध समाजाचा २४ ला परिणयोत्सव

0
8

आमगाव : भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दल तालुका आमगाव यांच्या संयुक्त विद्यमाने बौद्ध समाज सामूहिक विवाह सोहळा रविवारी २४ एप्रिलला सकाळी ११ वाजता जि.प. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आमगाव येथे आयोजित करण्यात आला आहे. सदर सोहळ्यात बौद्ध समाजाची २१ जोडपी परिणयबद्ध होणार आहेत.
बौद्ध समाजाची आर्थिक बचत व्हावी, वेळेची व पैशाची बचत व्हावी, समाजाला कर्जमुक्त व दारिद्रय़मुक्त करण्याच्या उदात्त हेतूने सदर विवाह सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
आई-वडिलांनी कर्जबाजारी होवून आपल्या मुला-मुलींचे लग्न करण्यापेक्षा सामूहिक विवाह सोहळ्यात लग्न करावे. तसेच विवाह सोहळा यशस्वी होण्यासाठी सढळ हाताने आर्थिक मदत करून धम्मकार्यास सहकार्य करावे, असे आवाहन भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष बलिराम खोब्रागडे यांनी केले आहे.
जिल्ह्यातील इच्छुक भावी वर-वधूंनी आपले नावांची नोंद संघटनेकडे करून घ्यावे व सदर विवाह सोहळ्यात सहभागी व्हावे, असे आयोजकांनी कळविले आहे. विवाह सोहळा यशस्वी करण्यासाठी भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दलाचे पदाधिकारी बलिराम खोब्रागडे, भरत वाघमारे, कला बागडे, आनंद बन्सोड, मनोहर कोटांगले, योगेश रामटेके, सोमकांत भालेकर, सुरेश बोरकर, विनोद रंगारी, संदीप मेश्राम, रविंद्र खापर्डे, अनिल डोंगरे, सिद्धार्थ डोंगरे, नरेंद्र हुमणे, विलास डोंगरे, निरू फुले, सुनील बडोले, रामेश्‍वर श्यामकुवर, अरविंदा राहुलकर, मुकेश रामटेके, राजेंद्र सांगोळे, राजेंद्र बन्सोड, धनंजय रामटेके, निखिल मेश्राम, राजू मेश्राम, भजनदास बोरकर, अँड. सुरेंद्र गायकवाड, राजू डोंगरे, सुनील मेश्राम, आलोक बोरकर आदी सहकार्य करीत आहेत.