गोरेगाव पोलिस ठाण्यात पक्ष्यांसाठी भोजनालय

0
13
गोरेगाव : अन्न,वस्त्र, निवारा या             मानसाच्या मुलभूत गरजा आहेत. या               गरजांच्या पुर्ततेसाठी माणुस नेहमीच धडपडतो परंतु अन्न हा घटक मानवासहीत इतर सजीवसृष्टीसाठी देखील महत्वाचा आहे. मानवाने आपल्या सोईसाठी भौतिक सुविधांसह  हॉटेल तयार केले आहेत. परंतु प्राणी पक्ष्यांना मात्र अन्न पाण्यासाठी भटकावे लागते. उन्हाळ्यात पाण्यासाठी तडफडून अनेक पक्ष्यांचा मृत्यू होतो. अशा पक्ष्यांसाठी पाण्याची आणि अन्नाची सोय करण्याची वेळ आजच्या धकाधकीच्या युगात कुणाकडेच नाही. परंतु पक्ष्यांची तळमळ लक्षात घेवून गोरेगाव पोलिसांनी चक्क पक्ष्यांसाठी अन्न आणि पाण्याची सोय असलेले भोजनालय सुरू करून एक मोठा संदेश दिला आहे.            त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
 गोंदिया जिल्ह्यातील तापमानाचा पारा ४३ अंशावर पोहचला आहे. अनेक भागात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. माणुस कसातरी आपल्या पोटाची व्यवस्था करतो, परंतु प्राणी पक्ष्यांना तृष्णातृप्तीसाठी भटकावे लागते. उन्हाळ्यात पाण्याची सोय नसल्याने शेकडो पक्षी ‘सनस्ट्रोक’चे बळी ठरतात. उन्हाळ्यात पक्ष्यांना अन्नाची चणचण भासते. प्रसंगी अनेकदा त्यांचा मृत्यू होतो. नेमकी हिच परिस्थिती गोरेगाव पोलिसांनी गंभीरतेने घेत एक आदर्श जोपासला आहे. शांतता आणि सुव्यवस्था अबाधित ठेवणे हे पोलिसांचे कर्तव्य आहे.
परंतु गोरेगाव पोलिसांनी समाजातील शांतता, सुव्यवस्था आणि सुरक्षा या कर्तव्याला पार पाडत असतानाच                पक्ष्यांच्या सुरक्षेची देखील हमी घेतल्याचे जाणवते. पोलिसांचे नाव घेताच अनेकांच्या मनात नकारात्मक विचार येतात. परंतु पोलिस हे देशाचे बळ आहे.  सुरक्षेसह सामाजिक बांधिलकी पोलिस विभाग जपतो. गोरेगाव पोलिस प्रशासनाने अशाच प्रकारचा एक स्तुत्य उपक्रम राबविला असून खाकीतला माणुसपण समाजापुढे उभा केला आहे.
         पोलिस निरीक्षक रविंद्र शिंदे यांच्या                 पुढाकाराने पोलिस ठाण्याच्या परिसरात पक्ष्यांसाठी ५० पेक्षाही अधिक ठिकाणी हॉटेल तयार करून अन्न व पाण्याची सोय करण्यात आली आहे. पोलीस स्टेशन              परिसरात असलेल्या झाडांना जलपात्र आणि अन्नपात्र बांधुन त्या ठिकाणी पक्ष्यांसाठी अन्नपाण्याची सोय करण्यात आली आहे.  टाकाऊ वॅâनमध्ये ठेवण्यात आलेले अन्नपाणी ग्रहण करण्यासाठी शेकडो पक्ष्यांची किलबील या ठिकाणी सुरू असते. पक्ष्यांची तृष्णातृप्ती तर होतच आहे, सोबत पक्ष्यांचा वावर वाढल्याने येथील वातावरण चैतन्याने बहरले आहे. पक्ष्यांचा किलबीलाट पाहूण जणु                पोलिस ठाण्यात पक्ष्यांची शाळाच भरल्याचा भास होऊ लागला आहे. जिल्ह्यातील १०९ पेक्षा अधिक गावांना पाणी टंचाईचे चटके बसत आहेत. पाण्यासाठी अनेक पक्ष्यांचा मृत्यू होत आहे. अशावेळी पोलिसांनी पुढारलेले उपक्रम परिसरातील पक्ष्यांसाठी वरदान ठरले आहे.