गुरुजींचा मुलगा झाला “आयएएस’

0
14

सोलापूर – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भांबेवाडी (ता. मोहोळ), या शाळेत शिकलेले हनुमंत झेंडगे हे “आयएएस‘ झाले आहेत. कोंडिबा झेंडगे या गुरुजींच्या मुलाला देशात 50वी रॅंक मिळाली आहे. राज्यात तिसरा येण्याचा मान त्यांनी पटकाविला आहे. जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थीही “आयएएस‘ होऊ शकतो, हे श्री. झेंडगे यांनी दाखवून दिले आहे. 

श्री. झेंडगे यांनी यापूर्वीही 2014 केंद्रीय लोकसेवा आयोगाची (युपीएससी) परीक्षा दिली होती. त्या वेळी त्यांना 460 रॅंक मिळाली होती. त्यानंतर ते भारतीय राजस्व सेवा याअंतर्गत हैदराबाद येथे प्रशिक्षण घेत होते. ते प्रशिक्षण घेत असताना त्यांनी आपली परीक्षेची तयारी सुरूच ठेवली होती. आपल्याला “आयएएस‘ व्हायचेच, हा ध्यास त्यांनी मनामध्ये ठेवला होता.  या परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर भांबेवाडी या त्यांच्या गावी आनंदोत्सव साजरा करण्यात आला.