तुमसरेंने वाचविले आकाशचे प्राण

0
8

साकोली-शुक्रवारी दुपारी अचानक आलेल्या वादळी पावसाने साकोलीत जोरदार हजेरी लावली. त्यामुळे प्रत्येकजण जीव वाचविण्यासाठी घर किंवा झाडाचा आसरा घेत होता. आकाश वाघाडे हा १६ वर्षीय तरुण बाजारातून घरी येत असताना अचानक तोही या वादळात सापडला म्हणून त्याने एका झाडाखाली आसरा घेतला. मात्र वादळ एवढे जोरदार होते की, या वादळामुळे झाड पडले व या झाडामुळे पानठेलाही पडला. यात आकाश वाघाडे पूर्णपणे दबला.
दरम्यान, यावेळी डॉ. तुमसरे, त्यांचे वडील यांनी दवाखान्यातील काही कर्मचार्‍यांना घेऊन घटनास्थळावर आले व त्यांनी स्वत:च्या जीवाची पर्वान करता गारपीट, वादळवार्‍यात व पावसात शर्तीचे प्रयत्न करुन आकाशला काढून त्यांचेवर औषधोपचार केला व आकाशला जीवदान दिले.