शेकडोंच्या आशीर्वादाने पार पडला सरीताचा विवाह सोहळा

0
16

गोंदिया : आई-वडीलांचे अकाली निधन, पाठीशी दोन भावंडे अन् भरीसभर घरही पडले, मायेचे छत्र आणि निवारा हरपलेली आसोली येथील ही तीन भावंडे.गावच्या शिक्षकांनी प्रा. सवीता बेदरकर यांना त्या मुलांची व्यथा सांगितली. बेदरकर यांनी त्या निराश्रीत भावंडांची भेट घेवून २५ हजार रुपयांची आर्थिक मदत करून घराचे काम सुरू केले. लोक वर्गणीतून जवळपास ८० हजार रुपये जमा झाले. या निधीतून निवारारुपी त्यांच्या डोक्यावर छत आले. घरातील मोठी असलेली सरीता हिने स्वत:च्या शिक्षणासह दोघ्या भावंडांचे सांभाळ केले. त्यांचे शिक्षणदेखील अखंडीत सुरू ठेवले.
दरम्यान सरीता हीचे विलास या नवयुवकासोबत लग्न ठरले. दरम्यान मायेचे छत्र हरपलेल्या या मुलीला समाजसेवकांनी आधार दिला. लोकसहभागातून विवाह सोहळा पार पाडण्यासाठी डॉ.घनश्याम तुरकर, अजय मेंढे, रंजना शहारे, साकेत पब्लिक स्वूâलचे व्यवस्थापक डॉ.इंदिरा सपाटे, वैशाली खोब्रागडे, नानन बिसेन, लक्ष्मी आंबेडारे, संतोष भेलावे, हरिष मोटघरे, डी.डी.मेश्राम, डॉ.माधुरी नासरे, दिव्या भगत, नंदा बिसेन, जितेश राणे, यशोधरा सोनवाने, तापस शहा, मधुर मेश्राम, दिनेश उके, हरिष गोपलानी, महेंद्र मडामे, संगीता घोष, मिलींद वंâगाली, अशोक बेलेकर, प्रा.नागदेवे, प्रा.सवीता बेदरकर, आदींसह शेकडो नागरिकांनी मदतीचा हात दिला. लोकवर्गणीतून संपूर्ण विवाह सोहळा आनंदात पार पडला. या विवाह सोहळ्याला होम डिवायएसपी राठोड, ठाणेदार सोनवाने, पुजा तिवारी, नेतराम कटरे, कुशल अग्रवाल, भरत छत्रीय, धनेंद्र भुरले, वैâलास भेलावे, पंकज सोनवाने आदिंसह हजारोंची उपस्थिती होती.
आई-वडीलांचे आधार हरवलेल्या सरीताला समाजातील दानशूर लोकांनी आधार दिला. जवळपास २ हजार लोक या विवाह सोहळ्यात आशीर्वाद देण्यासाठी उभे होते.