म्हसवानी येथील बंधार्‍याचे काम गावकर्‍यांनी थांबविले

0
9

सडक अर्जुनी : तालुक्यातील डव्वा जिल्हा परिषद गटात्ंगत म्हसवानी येथील नाल्यावर लघू पाटबंधारे विभाग कार्यालय आमगाव मार्फत ‘जलयुक्त शिवार’ योजनेंतर्गंत बंधार्‍याचे  बांधकाम करम्यात येत आहे.परंतु कंत्राटदारांने बांधकामात निकृष्ठ साहित्याचा वापर सुरु केल्याने गावकर्यानी विरोध करीत कामच थाबविले.अभियंता शेट्टे यांच्याकडे हे काम असून त्यांच्या कार्यकाळात निकृष्ठ कामाची परंपराच राहिली तरीही लपा विभागाने शेटेची पाठराखन नेहमीच केल्याची चर्चा आहे.कंत्राटदारांनी दहा एम.एम. लोखंड (जंग) लावण्याऐवजी आठ एम.एम. लोखंड लावला. त्याचप्रमाणे निकृष्ठ दर्जाच्या गिट्टीचा वापर करुन काम करणे सुरू होते. त्यावेळी गावकर्‍यांच्या माध्यमातून अधिकारी बोलावून काम थांबविण्यात आले आहे.
शासनाने गुर्‍हे, जंगली प्राण्यांसाठी पाणी राहावे तसेच शेतकर्‍यांना पाणी मिळावे याकरिता ‘जल शिवार’ योजनेच्या माध्यमातून बंधार्‍याची निर्मिती करण्याची योजना आखली. त्याकरिता शासन अंदाजे अठरा लाखांचा बांधकामाचा मोबदला देत असून कंत्राटदार वर्ग अधिक नफा कमविण्याकरिता निकृष्ठ दर्जाचे काम करताना दिसत आहे. लपा विभागाचे कार्यकारी अभियंता पाथाडे हे तर मी काय करु असे म्हणत फक्त कार्यालयात बसून राहत असल्याने त्यानाही या जिल्ह्यात स्वारस्य दिसून येत नाही त्यामुळेच की काय वर्ष लोटूनही त्यांच्या कार्यकाळात कामाची गती दिसून येत नाही.
त्यामुळे वरिष्ठ अधिकार्‍यांनी या म्हसवाणी नाल्यावरती बंधार्‍याची चौकशी करुन बिल थांबविण्यात यावे व चांगल्या प्रकारे काम करणार्‍या कंत्राटदाराकडून काम करुन बंधार्‍याची निर्मिती करण्याची मागणी गावकर्‍यांकडून केली जात आहे.