ओबीसीमध्ये वैचारिक क्रांती येण्याची गरज-नागेश चौधरी

0
16

नागपूर दि.10:आपला ओबीसी समाज अद्यापही पाटीलकीच्या स्वप्नात वावरुन स्वतःला मागासवर्गीय समजायला लाजतो.तर दुसरीकडे आरक्षणाच्या भूमिकेबाबत उच्चवर्णीयांनी त्यांच्या मनात निर्माण केलेल्या चुकीच्या गोष्टींना योग्य मानून बसल्यानेच मंडल आयोगासारख्ये अनेक निर्णय ओबीसींच्या हितासाठी राहूनही यशस्वीपणे लागू होऊ शकले नाही.या सर्व गोष्टी आपल्याला आपल्या समाजासाठी मिळवून घ्यायच्या असतील तर सर्वात आधी आपल्यातील वैचारिक पातळी सुधारण्यासोबतच वैचारिक क्रांती जोपर्यंत निर्माण होत नाही,तोपर्यंत ओबीसी समाजाचा दुरुपयोग उच्चवर्णीय आपल्या सत्तेसाठी करणार असल्याचे ठाम प्रतिपादन जेष्ठ विचारवंत व ओबीसी बहुजन चळवळीचे जेष्ठ नेते नागेश चौधी यांनी व्यक् केले.ते पुढे म्हणाले की,आरक्षणाच्या भूमिकेबाबतही आपल्या समाजात गैरसमज निर्माण केला जातो.इंग्रजाच्या काळात १८७८मध्ये महात्मा फुल्यांनी सर्वात प्रथम इंग्रजाकडे आरक्षणाची भूमिका मांडून बहुजन शेतकèयांना समान न्याय व हक्क देण्याची मागणी केली होती.त्याचा वासरा राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या राज्यात ५० टक्के आरक्षण बहुजनाना देऊन सत्तेत सहभागी असलेल्या गैरबहुजनांच्या बरोबरीत आणण्याचे काम केले होते.परंतु त्यानंतर आलेल्या सरकारने ५० टक्केचे ते आरक्षण २७ टक्क्यावर आणून ठेवले ही या पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्राची दुरावस्था असल्याचेही म्हणाले.ते येथील धनवटे नॅशनल कॉलेजच्या सभागृहात आयोजित विदर्भस्तरीय सर्व ओबीसी संघटनांनी तयार केलेल्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने येत्या ७ ऑगस्ट रोजी आयोजित ओबीसी महाधिवेशनाच्या निमित्ताने नियोजन बैठकित रविवार(दि.१०) बोलत होते.चौधरी म्हणाले की आपण जेव्हा ओबीसीसांठी लढा देतो तेव्हा फक्त qहदू ओबीसींचा विचार करीत आहोत,परंतु आपल्या चळवळी,शीख,मुस्लीम,खिश्च्रन या समाजातील ओबीसींनाही सामावून घेण्याची वेळ आहे.५२ टक्के ओबीसीमध्ये सर्वधर्मीय ओबीसींचा समावेश महत्वाचा असून येत्या अधिवेशनात त्या दृष्टीने विचारमंथन व्हावे असेही म्हणाले.
बैठकीला राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सयोंजक व महाधिवेशनाचे स्वागताध्यक्ष प्राचार्य बबनराव तायवाडे,सचिन राजुरकर,प्रा.जेमिनी कडु.सुषमा भड,नितिन चौधरी,नुतन माळवी,प्रभाकर दुपारे,प्रा.दिवाकर गमे,खेमेंद्र कटरे, शरद वानखेडे,प्रा.एन.जी.राऊत, गुणवंतआरीकर,अ‍ॅड.अशोक यावले,प्राचार्य अशोक गव्हानकर,प्राचार्य आष्टनकर,बबनराव नाखले यांच्यासह विदर्भातील ओबीसी संघटनांचे पदाधिकारी, ओबीसी जाती व पोटजातींचे पदाधिकारी उपस्थित होते. प्राचार्य तायवाडे म्हणाले की,गेल्या विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात आपल्या संघटनांचे काम चांगले आहे.परंतु नागपूर शहर व जिल्ह्यात त्याप्रमाणात हे काम कमी होते परंतु गेल्या चार पाच बैठकांनतर रामटेक,काटोल,नरखेड,qहगणा तालुक्यासह शहरातही ओबीसींच्या प्रश्नावर समाजात जनजागृती होऊ लागल्याने भविष्यात या शहरातील संघटनही बळकट होईल.आपण ओबीसी एकच आहोत हक्कासाठी लढणे आमचे कर्तव्य असून पक्षविरहीत चळवळ आपण राबवित आहोत.येत्या ७ ऑगस्टच्या महाधिवेशनात मंडल आयोगासाठी लढा देणारी बहुतांश सर्वच मंडळी आणि विदर्भातील सर्वच खासदार व आमदारांना आपण आमंत्रित करणार असल्याचीही माहिती दिली.नितिन चौधरी यांनी ओबीसी महाधिवेशनाच्या निमित्ताने पुन्हा मंडल चळवळीच्या आठवणींना उजाळा मिळणार असून या अधिवेशनातून समाजात चांगला संदेशच नव्हे तर आपला उद्देश पोचण्याची आवश्यकता असल्याचे म्हणाले.सोबतच चळवळीमध्ये जोपर्यंत विद्यार्थी सहभागी होणार नाही तोपर्यंत क्रांती होणार नसल्याचेही म्हणाले.प्रा.दिवाकर गमे यांनी २७ जुर्लेच्या राज्यव्यापी शाळा कॉलेजबंद आंदोलनात सर्वांना सहभागी होण्याचे आवाहन करीत आपली आंदोलने फक्त इवेंट ठरू नये त्यासाठी विद्याथ्र्यांमध्ये जनजागृती होण्याची आवश्यकता असल्याचे म्हणाले.
सचिन राजुरकर यांनी आम्हाला ६ लाखाचा शासन निर्णय नको तर क्रिमिलेयरच्या मर्यादेतला शासन निर्णय हवा आहे.शासनाने आमची जनगणना करुन ओबीसी मंत्रालयाची स्थापना करावी आणि ओबीसी शिष्यवृत्तीचा प्रश्न मार्गी लावावा.येत्या २०१८ मध्ये ओबीसीसमाजात जनजागृतीसाठी ओबीसी जनजागृती रथयात्रा काढण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.वरिष्ठ पत्रकार प्रभाकर दुपारे यांनी ओबीसींचे नेते मोठे झाले की मनुवादी त्यांचा बळी घेतात त्याचे उदाहरण हे छगन भुजबळ असून आपणही सावध राहायला हवे.ओबीसींनी आपल्या हक्कासाठी लढा देत असताना आबेंडकरी चळवळीलाही सोबत घेण्याची गरज आहे.कारण त्यांनी आपल्या मनातील आणि घरातील कुप्रथांना बाहेर फेकून दिल्यानेच ते प्रगती करुन आपल्या हक्कासाठी लढा देऊ शकले.मात्र आपला ओबीसी समाज आजही दैववाद आणि मनुवाद्यात गुरफुटल्यानेच आपल्या चळवळींचे आंदोलन यशस्वी होत नाही ही खंत व्यक्त महात्मा फुलेनंतर पाहिजा तसा नेतृत्व बहुजन ओबीसी समाजाला मिळाला नसल्याचे म्हणाले.
वर्धाचे नितीन झाडे ांनी ओबीसी समाजापर्यतं हिताचे शासन निर्णय पोचविणे आवश्यक आहे.प्रा.आष्ठनकर यांनी लोकप्रतिनिधींनाही आपल्याला धडा शिकविण्याची आवश्यकता असल्याचे म्हणाले जातपातीच्या नावावर राजकारण करणारे ओबीसींच्या नावावर पक्षाच्या आदेशाचे नाव सांगतात त्यामुळे त्यांनाही जागा दाखविणे आवश्यक आहे.प्रा.नुतन माळवी यांनी ओबीसी विरोधी qहदुत्ववादी सघंटनानी कधीच ओबीसी समाजातील युवकांना खरी माहिती कळू दिली नाही त्यामूळे या समाजातील युवक पंगू झाल्याने जे आपल्या मंडलच्या विरोधात राममंदिराची यात्रा काढतात ते आपले हितेशी होऊच शकत नसल्याची भूमिका मांडली.सामाजिक बदल करतांना सर्वांना सोबत घेणे आवश्यक असून दलित ,आदिवासी व ओबीसी मधील जोपर्यंत दरी मिटत नाही,तोपर्यंत सामाजिक भान निर्माण होऊ शकत नसल्याचेही त्या म्हणाल्या.अ‍ॅड.विलास कडू यांनी मोठ्या संख्येने असलेला ओबीसी अधिकारी,कर्मचारी या वर्गाला आपल्यासोबत घेण्याची गरज जेवढी आहे तेवढीच त्यांनीही ओबीसी संघटनांच्या पाठीशी राहण्याची गरज असल्याचे विचार व्यक्त केले. 12 Jully 04
खेमेंद्र कटरे यांनी विदर्भस्तरावर सर्व ओबीसी संघटनांची कृती समिती ओबीसी राष्ट्रीय महासंघाच्या माध्यमातून तयार करण्यात यावी.तसेच येत्या २७ जुर्लेच्या समता परिषदेच्या राज्यव्यापी शाळा कॉलेजच्या बंदमध्ये आपल्या सर्व संघटनानी सहभागी व्हावे असे विचार व्यक्त करीत ओबीसीच्या महाधिवेशनात ओबीसी लोकप्रतिनिधींना बोलवण्यात यावे असे म्हणाले.डॉ.राजेश ठाकरे यांनी ग्रामीण भागापर्यंत चळवळ पोचविण्यासाठी जाहिरातीचा तंत्र वापरण्याची आवश्यकता असल्याचे म्हणाले.यावेळी सुषमा भड,निकेश पिने,अ‍ॅड.अशोक यावले