108 क्रमांकाची रुग्णवाहिका पिकनिकला पोचली ‘ढास’ वर

0
9

खेमेंद्र कटरे
गोंदिया,दि.10-ग्रामीण भाग असो की शहरी भाग तेथील प्रत्येकाला वेळेवर आरोग्यसेवेचा लाभ मिळावा.गावखेड्यातील रुग्णाला त्वरीत उपचार मिळावे यासाठी ग्रामीण रुग्णालयासह प्राथमिक आरोग्य केंद्रांनाही आरोग्य विभागाने रुग्णवाहिका (एम्बुलंस) उपलब्ध करुन दिली आहे.त्याच कळीत गोंदिया जिल्हा सामान्य रुग्णालयातर्गंत येत असलेल्या चिचगड ग्रामीण रुग्णालयालाही आदिवासी भागातील रुग्णांना त्वरीत उपचार मिळावे यासाठी 108 क्रमांकाची रुग्णवाहिका एमएच 14-सीएल 0750 उपलब्ध करुन देण्यात आली आहे. dhas
मात्र ही रुग्णवाहिका आज रविवारला(दि.10)दुपारी 1 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत कुठल्या रुग्णाला घेऊन चिचगड नजीकच्या ढास या पर्यटनस्थळी गेली होती.त्या ठिकाणी कुठले वैद्यकिय अधिकारी उपचारासाठी आले होते हे मात्र कळले नाही.त्यातच आमच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सदर रुग्णावाहिकेत कुठलाही रुग्ण नव्हता परंतु तब्बल चार तास ही रुग्णवाहिका आणि त्यामध्ये आलेल्या काहींनी ढास या पर्यटन स्थळाचा मनसोक्त आनंद घेतल्याची माहिती दिल्याने रुग्णवाहिका ही रुग्णासांठी की पिकनिक साठी अशा प्रश्न उपस्थित झाला आहे.