तिरंगा यात्रेने संचारला देशभक्तीचा उत्साह

0
21

गोंदिया – देशाच्या स्वातंत्र्याच्या ७० व्या वर्षानिमित्त ‘आझादी ७०, याद करो कुर्बानी’ या उपक्रमाअंतर्गत १५ ऑगस्ट ते २२ ऑगस्ट पर्यंत संपूर्ण देशात तिरंगा यात्रेचे आयोजन केले जात आहे. देशासाठी बलिदान देणाऱ्या शहिदांना व स्वातंत्र्य सैनिकांना आदरांजली देण्याचा हा कार्यक्रम आहे. या अंतर्गत गोंदिया शहरात खासदार नानाभाऊ पटोले यांच्या नेतृत्वात १९ ऑगस्ट रोजी भव्य मोटरसायकल रैली काढण्यात आली. हातात तिरंगा घेतलेल्या शेकडो युवकांद्वारे ‘भारत माता कि जय’ च्या जयघोषाने शहरात राष्ट्रभक्तीचा एकच जोश व उत्साह दिसून आला. जागोजागी आतिषबाजी व हार घालून रैली चे जोरदार स्वागत करण्यात आले. दरम्यान खासदार पटोले यांनी शहरातील स्वातंत्र्य संग्राम सैनिकांचे शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला.
तिरोडा येथून दुपारी ४ वाजता खा नानाभाऊ पटोले यांच्या नेतृत्वात तिरंगा यात्रेचे गोंदिया येथील कुडवा येथे आगमन झाले. या वेळी उपस्थित जनसमुदायातर्फे त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. भाजप जिल्हाध्यक्ष हेमंत पटले यांनी झेंडी दाखवून तिरंगा यात्रेचे शुभारंभ केले.