‘पतंग उडवतांना सावधानी बाळगा‘, महावितरणचे आवाहनःःः!!!

0
22

गोंदिया दि. 6:- पतंग उडविण्याचा मोह लहानापासून तर मोठयापर्यंत सर्वांनाच होतो. हा मोह त्यांना टाळता येत नाही. दहा दिवसावर असलेल्या सक्रांतीचे गोंदियावासीयांना वेध लागलेले आहे. संक्रांतीत पतंगबाजीचा आनंद लुटण्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. शहरातील कानाकोप-यात पतंग व मांजाची दुकाने सर्वत्र थाटलेली असून दिवसेंदिवस आकाशातही रंगबिरंगी पतंगांची गर्दी वाढतच आहे. या आनंदाच्या उत्सवात विघ्ऩ येऊ नये, याकरीता महावितरण गोंदिया परिमंडळातर्फे सर्व संक्रांतप्रेमींना पतंग उडवितांना सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले आहे.

पतंग उडवतांना मुलांवर पालकांनी लक्ष दयावे :- पतंग उडवतांना मुलांकडे लक्ष देणे हे प्रत्येक जागरूक पालकाचे कर्तव्य़ आहे. पालकांनी याबाबत दक्ष राहून लहान मुलांना सुरक्षितपणे पतंग उडविण्याबाबत मार्गदर्शन करावे. वीजप्रवाह असलेल्या यंत्रणेपासून दूर राहूनच पतंगोत्स़व साजरा करावा. अपघाताच्या दुर्दैवी घटना टाळण्यासाठी सावधानता बाळगावी. सक्रांतीच्या या सणात पतंग उडवतांना कुठलीही अप्रिय घटना होऊ नये याची काळजी घेणे आवश्य़क आहे.

खांबावरची अडकलेली पतंग काढू नका :- शहरात वीज वितरणच्या लघु व उच्च़ दाबाच्या वाहीण्यांचे जाळे सर्वत्र पसरलेले आहेत. अनेकदा पतंग उडवितांना किंवा कटलेले पतंग विजेच्या तारांवर किंवा खांबावर अडकतात, अश्यावेळी काहीजण ती अडकलेली पतंग काठया, लोखंडी सळाखी किंवा गिरगोट यांच्या माध्य़मातून काढण्याचा प्रयत्ऩ करतात. अशाप्रसंगी अनेकदा जिवंत विद्युत तारेला स्प़र्श होण्याची शक्य़ता असते. त्यामुळे अडकलेली पतंग काढण्याचा प्रयत्ऩ जीवावर बेतू शकतो. ही बाब लक्षात घेता कुणीही अडकलेली पतंग काढण्याचा प्रयतन करू नये, असे आवाहन महावितरण तर्फे करण्यात आले आहे.

मांजा देतो अपघाताला निमंत्रण :- बरेचदा अडकलेल्या पतंगाचा मांजा खाली जमिनीवर लोंबकळत असतो, हा मांजा ओढून पतंग काढण्याच्या प्रयत्नातही विजेचा भिषण अपघात होण्याची दाट शक्यता असते. मांजा ओढतांना एका तारेवर दुस-या तारेचे घर्षण होवून शॉर्टसर्किट होण्याची व प्राणंकीत अपघताची शक्यता असते. सद्या बाजारात धातूमिश्रित मांजा मोठया प्रमाणत विक्रीकरीता उपलब्ध़ आहे. हा मांजा वीजप्रवाहीत तारांच्या संपर्कात आल्यास किंवा रोहित्र वा वीज वितरण यंत्रणेच्या संपर्कात आल्यास त्यातून वीज प्रवाहीत होऊन प्राणंकीत अपघाताची दाट शक्यता असते. सक्रांत हा आनंदाचा उत्स़व असून या उत्स़वाला गालबोट लागू नये, याकरीता पतंग उडवितांना पुरेपूर सावधानी बाळगणे गरजेचे आहे.

तारांवर अडकलेली पतंग काढणे टाळावे :- ब-याच वेळेस तारांवर अडकलेली पतंग काढायचा मोह लहान मुलांना व मोठयांनापण असतोच. हे न केलेलेच बरे. कारण सर्वात महत्वाचे म्ह़णजे पतंग काढण्याच्या प्रयत्नातही वीजेचे भीषण अपघात होण्याची शक्यता असते. पतंग काढण्यासाठी दगडाला दोरा बांधुन तारांवर फेकु नये.

वीज तारा असलेल्या परिसरात पतंग उडवणे टाळलेलेच बरे :- जागेअभावी बरीच बालके घराजवळच्या गल्लीत पतंग उडवतांना संक्रातीच्या वेळेस आढळतात. असे न करता पतंग उडवण्यासाठी मोठया मैदानातच पतंग उडवावी, जेणेकरून वीजेसंबधीत कोणतीही दुर्घटना टाळण्यास मदत होईल.यामुळे मकर संक्रातसारखा सण साजरा करतांना सर्वांच्या आनंदात भर पडेल.