रविवारला जिल्ह्यातील तलावांवर पक्षीगणना

0
10

गोंदिया,दि.२७- दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुध्दा गोंदिया जिल्ह्यातील महत्वपुर्ण तलावामध्ये देश व विदेशातून तसेच स्थानिक वावर असलेल्या विविध प्रजातीच्या पक्ष्यांची गणना येत्या २९ जानेवारीला सकाळी ९ वाजतापासून करण्यात येणार असल्याची माहिती सेवा संस्थेचे अध्यक्ष व मानद वन्यजीव रक्षक सावन बहेकार यांनी दिली आहे.
ही पक्षीगणना सेवा संस्थेसोबतच इतर वन्यजीव व पक्षीमित्र म्हणून काम करणाèया स्वयसेवीसंस्था व वनविभागाच्या सहकार्याने २९ जानेवारीला सकाळी ९ वाजता करण्यात येणार आहे.या गणनेच्यावेळी वनविभाग ,वन्यजीव विभागाचे वरिष्ट अधिकारी,कर्मचारी यांचे मार्गदर्शन मिळणार असून ही गणना परसवाडा,झीलमीली,बाजारटोला,लोहारा(रतनारा),माकडी,घिवारी सलंगटोला सिवनी,घुमर्रा (कलपाथरी),नवतलाव कुंभारटोली,चोरखमारा,झालीया, करटी व नदी परिसरात करण्यात येणार आहे.तरी जिल्ह्यातील इच्छुकांनी तसेच स्वयसेवी संस्था,विद्यार्थीनी सहभागी होण्यासाठी आपल्यासोबत कॅमेरा,दुर्बीन नोटपॅड,पक्षी फिल्डगाईड व मोबाईल एॅप सोबत घेऊन येण्याचे तसेच अधिक माहितीसाठी संपर्कासाठी सावन बहेकार ९४२०५१५०४१ व मुनेश गौतम ९४०३३७१३९० यांच्याशी सपर्क साधावे असे आवाहन करण्यात आले आहे.