आम्रपाली इंगळे अण्णाभाऊ साठे पुरस्काराने सन्मानीत

0
12

गोंदिया,दि.१७ : जिल्ह्यात मातंग व मांगगारुडी समाजाच्या कल्याणासाठी काम करणाऱ्या गोंदिया येथील सामाजिक कार्यकर्त्या आम्रपाली इंगळे यांना नांदेड येथे ११ मार्च रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने देण्यात आलेल्या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्काराने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले. पुरस्कार म्हणून श्रीमती इंगळे यांना २५ हजार रुपयाचा धनादेश, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ देवून गौरविण्यात आले.
या पुरस्कार सोहळ्याला नांदेड जि.प.च्या अध्यक्ष मंगला गुंडले, महापौर शैलजा स्वामी, आमदार सर्वश्री अमरनाथ राजुरकर, डी.पी.सावंत, प्रताप पाटील-चिखलीकर, सुभाष साबणे, हेमंत पाटील, नागेश पाटील-आष्टीकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. श्रीमती इंगळे जिल्ह्यात या समाजाला रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्नशील राहत असून त्यांच्यासाठी आरोग्य शिबीर, जात प्रमाणपत्र शिबीर, रेशन कार्ड शिबीर तसेच या समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे व त्यांच्या सामाजिक न्याय हक्कासाठी लढा देत असतात.