पालकमंत्री बडोलेंंनी मरणोप्रांत देहदानाचा घेतला संकल्प

0
14

गोंदिया,(berartimes.com)दि.30–- जिल्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी आपल्या ५५ व्या वाढदिवसाला देहदान करण्याचा संकल्प घेतला असून बडोले यांच्या ३५ चाहत्यांनी देखील बडोले यांच्या वाढदिवसाचे अवचित्त साधून मरणोप्रांत देहदान करणायचा संकल्प घेतला आहे.
अवयव दान आणि नेत्रदान करण्यासाठी शासन स्थरावर बरीच प्रसिद्धी करण्यात येत आहे .मात्र याची प्रत्यक्ष अमलबजावणी होत नसल्याने. गोंदिया जिल्ह्यातील पीपल्स रुरल इन्वायरमेंट मुव्हमेंट आणि वैद्यकीय महाविद्यलय गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या ५५ व्या वाढदिवसा निमित्त या देहदान संकल्प मेळाव्याचे आयोजन गोंदिया वैद्यकीय महाविद्यलयात करण्यात आले. विद्यार्थ्यांना तसेच उपस्थित लोकांना अवयवदान तसेच नेत्रदाना करण्याचे फायदे तज्ञांना तर्फे पटवून देण्यात आले.गोंदियातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात देहदान करणार असल्याचे बडोले यांनी यावेळी सांगितले. समाजातील इतर लोकांनी देखील मरणोप्रांत देहदान तसेच नेत्रदान करण्याचा संकल्प घ्यावा व इतरांना जीवनदान द्यावे असे आवाहन बडोले यांनी केले .