स्थापत्य सहायकांच्या पदोन्नत्या रखडल्याने,अभियंत्याची पदे रिक्त

0
19

गोंदिया,,(berartimes.com)दि.30–गोंदिया जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त सीईओ व सामान्य प्रशासन विभागाचे डेप्युटी सीईओंना बांधकाम व लघु पाटबंधारे विभागातील पदोन्नतीची प्रकरणे मंजूर करण्याचा अधिकार असतानाही गेल्या वर्षापासून हा विषय प्रलqबत राहिला.त्यामुळे सीईओ डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांनी ३१ मार्चच्या पुर्वी हे प्रकरण निकाली काढून आपल्याकडे अंतिम मंजुरीसाठी पाठविण्याच्या सुचना संबधितांना दिल्याने अभियंत्याच्या पदोन्नतीचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता बळावली आहे.
गोंदिया जिल्हा परिषदेचे अति.मुख्य कार्यकारीचे पद रिक्त असून या पदाचा प्रभार हे सामान्य प्रशासन विभागाचे डेप्युटी मुकाअ यांच्याकडेच आहे.त्यातच बांधकाम व लघुपाटबंधारे विभाग हा त्यांच्याच अंतर्गत येत असल्याने पदोन्नतीचे प्रकरण काढण्यास वेळ का अशा प्रश्नच सीईओ यांनी जि.प.सदस्य गंगाधर परशुरामकर यांनी उपस्थित केलेल्या मुद्यावर केला आहे.लघु पाटबंधारे विभागाकडून अडीचवर्षापासून पदोन्नतीने पदे भरुन लपा विभागातील रिक्त अभियंत्याची पदे भरण्यासाठी पाठपुरावा केला होता.त्यातच ऑगस्ट २०१६ मध्ये जिल्हा परिषद सदस्य परशुरामकर यांनी स्थायी व सर्वसाधारण सभेत मुद्दा उपस्थित करुन लेखी पत्रही सीईओंना दिले होेते.त्यामध्ये लघु पाटबंधारे विभागात २९ पदे मंजुर असून १२ पदे रिक्त आहेत.त्यापैकी पदोन्नतीने भरावयाची ७ पदे ही बांधकाम विभागात गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत असलेल्या स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकातून भरण्यात यावे असे म्हटले होते.मात्र त्याकडे बांधकाम विभागाचे अधिकारी व सामान्य प्रशासन विभागाच्या प्रमुखांनी वेळीच लक्ष न घातल्याने स्थापत्य अभियांत्रिकी सहायकांना पदोन्नतीपासून वंचित राहावे लागले.त्यांना पदोन्नती मिळाली असती तर ७ अभियंते लपा विभागाला मिळून प्रत्येक तालुक्याला एक अभियंताही उपलब्ध झाला असता असे परशुरामकर यांनी म्हटले आहे.यासंबधात सीईओ पुलकुंडवार यांची भेट घेऊन मार्चआधी पदोन्नतीचे प्रकरण निकाली काढण्याची विनंती केली तेव्हा सीईओंनी संबधितांना ३१ मार्चच्या आत हे प्रकरण निकाली काढण्याचे निर्देश दिले आहेत.
जे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक जि.प.च्या बांधकाम विभागात कार्यरत आहेत ,त्यांनी शासनाचे पदोन्नतीसाठी असलेली परीक्षा उत्र्तीण केली असली qकवा वयाचे ४५ वर्ष पूर्ण केले तर त्यांना पदोन्नती देता येते असा नियम असल्याची माहिती लपा विभागाच्या सुत्रांनी दिली.