१३ एप्रिलला कन्हैयाकुमार गोंदियात

0
11

गोंदिया,दि.०६(berartimes.com)-भारतरत्न प.पु.डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जंयती उत्सव समितीच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुध्दा दोनदिवसीय उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.१२६ व्या जयंती निमित्त जेएनयु दिल्लीचा विद्यार्थी नेता कन्हैय्याकुमार यावळेच्या मुख्य कार्यक्रमाला मार्गदर्शन करणार आहे.सोबतच विश्वजित कुमार व कोर्ट चित्रपटाचे कलावंत विरा साथीदार हे सुद्दा उपस्थित राहणार असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष डॉ.प्रशांत मेश्राम यांनी आज पत्रपरिषदेत दिली.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेशेजारील परिसरात हा कार्यक्रम सायंकाळी ६ वाजता सुरु होणार आहे.सामाजिक,राजकिय व धार्मिक सौहार्दटिकवून ठेवत कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही qकवा घडू न देणारा आपला गोंदिया शहर असल्याने कुठल्याही विरोधाची भिती नाही.आणि सवैधानिक अधिकार सर्वांनाच आहेत ते आपल्या सवैधानिक मार्गाने कुणी विरोध करीत असेल तरीही आमची समिती qकवा आमचा बहुजन समाजत्यावर कुठलाही आक्षेप किवा विरोधाची भूमिका घेणार नसून सर्वांना सोबत घेऊनच बाबासाहेबांच्या कार्याचा संपुर्ण क्षेत्रातील आढावा कन्हैय्या कुमार आपल्या मार्गदर्शनात ठेवणार असल्याची माहिती दिली.तसेच १४ एप्रिल रोजी गुणवंत विद्याथ्र्यांचा सत्कार डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय नागपूरचे डॉ.गौतम कांबळे,शरद काकोस यांच्या हस्ते करण्यात येमार आहे.या सर्व कार्यक्रमासाठी जिल्हा पोलीस अधिक्षक,जिल्हाधिकारी यांच्याशी समिती सातत्याने चर्चा करीत असल्याची माहितीही दिली.पत्रपरिषदेला विलास वासनिक,मिqलद गणवीर,डॉ.घनश्याम तुरकर,निलेश देशभ्रतार,सुनिल आवळे,धिरज मेश्राम,मधु बनसोड,अमित भालेराव,देवा रुसे,अतुल सतदेवे आदी उपस्थित होते.