डॉ.आंबेडकर जयंती समारोहाची तयारी जोरात

0
13

गोंदिया दि.12: डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक उत्सव समितीच्या वतीने १४ व १५ एप्रिल रोजी येथील सुभाष शाळेच्या मैदानात दोन दिवसीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या जयंती उत्सव कार्यक्रमाची तयारी जोरात सुरू असल्याची आयोजन समितीचे अध्यक्ष अरविंद साखरे यांनी दिली आहे.
१३ एप्रिल रोजी रात्री १२ वाजता भव्य आतषबाजी, १४ रोजी सकाळी ७.३0 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिमेजवळ बुद्ध वंदना, ८.३0 वाजता रामनगर बुद्धविहार येथून मोटारसायकल रॅली, ११ वाजता मध्य भारताचे सुप्रसिद्ध गायक प्रकाश सागर यांच्या बुद्ध भीमगीताचे आयोजन, १ वाजता मुख्य अभिवादन समारोह विलास वासनिक यांच्या हस्ते अरविंद साखरे यांच्या अध्यक्षतेखाली होईल. यावेळी बहुजन मुव्हमेंटचे विश्‍वास राऊत प्रामुख्याने उपस्थित राहतील. तर मुख्य मार्गदर्शक म्हणून प्रबोधनकार यशदा प्रशिक्षक गणेश हलकारे, संध्या सराटकर,बहुजनसंघर्ष चे सपांदक नागेश चौधरी,कार्यकारी अभियंता हेमंत गाणार,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.एस.डी.निमगडे,अधिक्षक अभियंता जे.एम.पारधी, मिलिंद बन्सोड, प्रा.उमेश बडोले,डॉ.सी.आर.टेंभुर्णीकर व अन्य प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी समाजातील प्रतिभावंत विद्यार्थी, समाजसेवक व सामाजिक कार्यकर्त्यांचा स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात येणार आहे. तेव्हा आयोजित कार्यक्रमाला शहरातील नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजन समितीने केले आहे.