गोरेगाव बसस्थानकावर श्रीराम प्याऊचे शुभारंभ

0
12

गोरेगाव,दि.12 : स्थानिक बस स्थानकावर पिण्याच्या पाण्याची गैरसोय लक्षात घेऊन मे.कन्स्ट्रक्शनचे संचालक लक्ष्मीकांत बारेवार यांनी आपल्या कार्यालयापुढे प्रवासी व इतर नागरिकांकरिता थंड पाण्याची गरज पूर्ण व्हावी म्हणून आपले वडील श्रीराम बारेवार यांच्या स्मरणार्थ श्रीराम प्याऊ ९ एप्रिल रोजी उद्घाटित करून प्याऊचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी लक्ष्मीकांत बारेवार यांनी विधिवत पूजन केले. यावेळी श्रीचंद रोहडा, राहुल कटरे, रवींद्र चन्ने, निसार पठाण, नगर उपाध्यक्ष इंजि. आशिष बारेवार, विकास बारेवार, युवा शक्ती स्पोर्ट्स क्लबचे सर्व सभासद प्रामुख्याने उपस्थित होते. स्थानिक बसस्थानकाजवळ पिण्याच्या थंड पाण्याची सोय झाल्यामुळे प्रवासी व इतर नागरिकांनी यावेळी आनंद व्यक्त केला. बस स्थानकावर पिण्याच्या पाण्याची सोय नसल्यामुळे पाणी मिळत नव्हते.