दिव्यांगासाठीच्या व्हिलचेअर सुविधेचे राजकुमार बडोले यांच्या हस्ते उद्घाटन

0
12

मुंबई, दि. 12 : सामाजिक न्याय विभागाच्या अपंग वित्त व विकास महामंडळ यांच्या माध्यमातून दिव्यांगासाठी दोन व्हिलचेअरची सुविधा करण्यात आली आहे. याचे उद्घाटन मंत्रालयातील त्रिमुर्ती प्रांगणात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते करण्यात आले.
मंत्रालयात दररोज दिव्यांग व्यक्ती विविध विभागात कामासाठी येतात. त्यांना एखाद्या विभागात पोहोचण्यासाठी बरेच शारीरिक कष्ट घ्यावे लागत होते याची दखल सामाजिक न्याय विभागाने घेतली असून, आता त्यांना मंत्रालयात येण्या-जाण्यासाठी व्हिलचेअरची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.दिव्यांगासाठी मंत्रालयात येण्या-जाण्यासाठी दोन व्हिलचेअरची सोय करण्यात
आली असून यासाठी दोन सक्षम कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे दोन कर्मचारी दिव्यांग व्यक्तीची ने-आण करण्यासाठी व्हिलचेअरच्या माध्यमातून मदत करतील. ‘सुगम्य महाराष्ट्र सुगम्य मंत्रालय’ ही संकल्पना श्री. बडोले यांच्या संकल्पनेतून साकार होत आहे. या योजनेचा लाभ मंत्रालयात येणाऱ्या दिव्यांग व्यक्तींना निश्चितच होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.