‘ फिल्म मेकिंग’ वर कार्यशाळा जुलैच्या दुसर्‍या आठवड्यात

0
17

नागपूर,दि.29 : ऑरेंज सिटी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलच्या यशस्वी शुभारंभानंतर २0१८ मध्ये होणार्‍या दुसर्‍या फेस्टिव्हलच्या तयारीच्या अनुषंगाने जुलै आणि नोव्हेंबरमध्ये दोन कार्यशाळांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती महोत्सवाचे प्रवर्तक व सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांनी रविवारी पत्रपरिषदेत दिली. या वेळी, सप्तकचे विलास मानेकर व अजेय गंपावार उपस्थित होते.

पहिल्या ऑरेंज सिटी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलला नागपूरसह मध्य भारतातून भरघोस प्रतिसाद मिळाला होता. या महोत्सवाच्या अनुषंगाने रसिकांमध्ये ओढ निर्माण होण्याच्या हेतूने गेल्या वर्षभरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्याचाच लाभ महोत्सवाकडे ओढ निर्माण होण्यात झाला. या वर्षीही महोत्सवाच्या तयारीच्या अनुषंगाने जुलै आणि नोव्हेंबरमध्ये दोन कार्यशाळांचे आयोजन करण्यात येत आहेत. जुलैच्या दुसर्‍या आठवड्यात ‘फिल्म मेकिंग’वर द्विदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात येत असून या कार्यशाळेत पुण्याच्या एमआयटी स्कूल ऑफ फिल्म अँण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटमधील प्राध्यापक येणार असल्याची माहिती डॉ. जब्बार पटेल यांनी दिली. दुसरी कार्यशाळा नोव्हेंबरमध्ये ‘फिल्म अँप्रिसीएशन’ या विषयावर घेतली जाणार आहे