त्या चारही मुलींच्या शिक्षणाचा खर्च वीरा करणार- श्रीहरी अणे

0
15

अर्जुनी/मोर.दि.२९ – वडिलांचे छत्र हरवून काहीच दिवस झाले असता आई ही मरण पावल्याने त्या चार मुली अनाथ झाल्या. आजोबा काका नी आधार दिला खरा पण फक्त एक एकर शेती आणि खेड्यातील सलूनची तोडकी दुकान ह्यावर आता त्यांचे भागणार नाही हे हेरून विदर्भ राज्य आघाडीचे संस्थापक अध्यक्ष श्रीहरी अणे ह्यांनी विदर्भ राज्य आघाडी ह्या विदर्भातील राजकीय पक्षातर्फे त्या चारही मुलींच्या भविष्यातील शिक्षणाचा खर्च करणार असल्याचे घोषित केले.
गोंदिया जिल्ह्यातील बोंडगाव/देवी नजीक निमगाव हे छोटसं खेड. अनिल सूर्यवंशी पत्नी व चार मुलिंसह ह्या गावी राहायचा. एक एकर शेती त्यात आई वडील व छोटा भाऊ आणि त्याचा परिवार. एक एकर शेतीत उदरनिर्वाह शक्य नसल्याने अनिल ने अर्जुनी/मोर येथे सलून ची दुकान थाटली. रूढी परंपरा व कमी शिकल्याने, वंशाला दिवा म्हणून मुलाच्या आशेने एका पाठोपात एक अश्या चार मुलीना जन्मास घातले. शेती आणि दुकानाच्या भरवश्यावर जेमतेम संसाराचा गाडा रेटताना अनिलने आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष दिले नाही. तब्येत खूप जास्त खालावल्यामुळे नागपूरला हलवावे लागले. उपचारादरम्यान वयाच्या ४० व्या वर्षी दगावला. पतीचे छत्र हरपताच पत्नी ने धीर सोडला. चार मुलींसह आता आपले कसे होणार ह्याच विवंचनेत ती एकटी एकटी राहायला लागली. दैनंदिन जीवनात तिला आता रसच उरला नव्हता. काय करावे काय नाही ह्याच विवंचने ती दिवस रात्र विचारमग्न असायची आणि ह्यातच तिचेही आरोग्य खालावले. पतीच्या निधनाचा धसका घेत दिनांक १९ मे २०१७ ला तिनेही आपले प्राण सोडले आणि आणि चारही मुली अनाथ झाल्या.
मोठी मुलगी मोहिनी हिने दहावीची परीक्षा दिली, तिच्या पाठी स्वाती आठवी, ज्योत्स्ना चवथी, आणि ट्विंकल हिने दुसरी ची परीक्षा दिली आहे. चारही मुलींची जवाबदारी काका आणि आजोबा ह्यांनी घेतली तरी त्यांचे पालनपोषण सुरळीत शक्य होणार कि नाही.त्यासंबंधी बातमी प्रकाशित होताच मदतीचे हात पुढे येत गेले पण त्या चारही मुलीना कायम स्वरूपी मदत व्हावी म्हणून विदर्भ राज्य आघाडीचे संस्थापक अध्यक्ष श्रीहरी अणे यांनी त्या चारही मुलींच्या भविष्यातील शिक्षणाचा खर्च उचलण्याची जवाबदारी घेण्याचे जाहीर केले. वीराचे कार्यकारी अध्यक्ष स्वप्न्जीत सन्याल यांनी हि मदतीचा हात पुढे करत  निमगाव गाठून त्या मुलीची भेट घेवून सांत्वन केले. साकोली निवासी वीराचे सचिव राकेश भास्कर यांना वेळोवेळी मदतनीस म्हणून नेमण्यात आले.ह्यावेळी पवन शहारे, महेंद्र निम्बार्ते, सनी तेलंग, सुनील जांभूळकर, बाळू गिर्हेपुंजे, प्रवीण भांडारकर, निलेश घरडे, ऋतन लोणारे व इतर उपस्थित होते.