विमल गाडेकर यांच्या ‘चंदनी दरवळ’दीर्घकाव्यसंग्राहाचे प्रकाशन

0
23

नागपूर: दि. २ डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्नी रमाबाई आंबेडकर यांच्या जीवनाचा चरित्रपट उलगडवून दाखविणारा ‘ चंदनी दरवळ’ हा दीर्घकाव्यसंग्रह प्रकाशीत होत आहे. या दीर्घकाव्याला जेष्ठ आभ्यासक डाॅ. गंगाधर पाणतावणे यांनी प्रस्तावना लिहीली आहे.रविवार दि. ४ जून रोजी सायंकाळी साडेपाच वाजता वर्धारोडवरील ऊरूवेला काॅलनीतील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृहात हा सोहळा संपन्न होणार आहे.

या कार्यक्रमाला फुले आंबेडकर समारोह समितीचे अध्यक्ष अरविंद सोमकुॅंवर, भीमराव तलवारे,वरिष्ठ पत्रकार जगन वंजारी, सुप्रसिद्ध कवी आणि शब्द साहित्य संम्मेलन दुबईचे अध्यक्ष प्रा. ज्ञानेश वाकुडकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.स्वत: चंदनासारखे झिजून अनेकांच्या आयुष्यात सुगंधी दरवळ पसरविणाऱ्या रमाबाई आंबेडकर यांच्या जन्मापासून ते मृत्युपर्यंतचा जीवनपट पहिल्यादाच काव्यात्मक स्वरूपात लिहीला गेला आहे. प्रा. विमल गाडेकर गेल्या चाळीस वर्षांपासून सामाजिक चळवळीत काम करित असून त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. समाजशास्त्राच्या प्राध्यापक म्हणून चंद्रपूर येथुन निवृत्त झालेल्या विमलताईंचे यापुर्वी ऋतुबंध, दरवेळी, गुलमोहर या सारखे कविता संग्रह प्रकाशित झाले असून अनेक वृत्तपत्रातून विविध विषयावर त्या सातत्याने लिखाण करित असतात.या वेळी रमाबाईंच्या जीवनावरिल प्रसंगाचे सादरिकरण करण्यात येणार आहे. मुंबई येथिल कलावंत डाॅ. जया चांदोरकर हे सादरिकरण करणार आहेत.