आमदार सोलेंच्या ग्रीन अर्थ संस्थेच्या वृक्षदिंडीचे जिल्ह्यात स्वागत

0
10

गोंदिया,दि.24-नागपूर पदवीधर मतदारसंघाचे भाजपचे आमदार प्रा.अनिल सोले यांच्या ग्रीन अर्थ आॅर्गनायझेनशच्यावतीने गेल्यावर्षीपासून विदर्भात वृक्षारोपणाचे महत्व पटवून देण्याकरीता वृक्षदिंडी काढण्यात येते.यावर्षी सुध्दा चंद्रपूरात या दिंडीचा शुभारंभ वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आला.आमदार सोलेंच्या संस्थेने काढलेल्या या वृक्षदिंडीला पुर्ण सहकार्य वनविभागाचे लाभले आहे.झा़डे देण्यापासून ते प्रचारप्रसारापर्यंत सर्वच शासकीय निधीतून हा कार्यक्रम होत असून आमदार सोलेंच्या नेतृत्वात फक्त आठ दहा गाड्या ज्यांच्यामध्ये जनजागृतीचे फलक लावलेले आहेत ती वाहने तालुका व जिल्हास्तरावर जाऊन शासकीय विभागाकडून कार्यक्रम घेऊन जनजागृती मोहीम राबविली जात आहे.ती जनजागृती वृक्षदिंडीचे गोंदिया जिल्ह्यात काल शुक्रवारला अर्जुनी मोरगाव तालुक्यात आगमन झाले.त्यांनतर आज गोंदिया शहरात आगमन झाले.गोंदिया शहरात  जयस्तंभ चौकात ग्रीन अर्थ ऑर्गनायझेशन व वनविभाग यांच्या संयुक्त रूपाने कार्यक्रम  घेण्यात आला. त्या कार्यक्रमाला गोंदिया भंडाराचे विधानपरिषद सदस्य डॉ. परिणय फुके, भाजपा जिल्हाध्यक्ष व माजी आमदार हेमंत पटले,माजी जि प अध्यक्ष नेतराम कटरे, न प उपाध्यक्ष शिव शर्मा, उपवनसरंक्षक एस युवराज,नगरसेवक बेबी अग्रवाल,विरेंद्र जायस्वाल,लिखेंद्र बिसेन,शहर अध्यक्ष सुनील केलनका,पंकज रहागंडाले,सहा.वनसरंक्षक यु.टी.बिसेन,वनपरिक्षेत्राधिकारी,रतन वासनिक,भरत क्षत्रिय,मोहिनि निंबार्ते,नंदुभाऊ बिसेन,नरेंद्र तुरकर आदि उपस्थित होते. या वेळी श्री सोले यांनी 1 जुलै ते 7 जुलै दरम्यान संपूर्ण राज्यात 4 कोटी वृक्षारोपण करण्याचे संकल्प पूर्ण करण्याकरीता सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले. या प्रसंगी कन्हार टोली येथे वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी मोठ्या संख्येने विविध संघटनेचे पदाधिकारी, नागरीक व वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.