खा.पटोलेंच्या हस्ते आरोग्यम् स्मरणिकेचे प्रकाशन

0
17

गोंदिया,दि.१२ : २१ जून या आंतरराष्ट्रीय योग दिवसाचे औचित्य साधून फुलचूर पर्यटन व पर्यावरण विकास मंडळ यांनी प्रकाशित केलेल्या आरोग्यम् या योग स्मरणीकेचे प्रकाशन खासदार नाना पटोले यांच्या हस्ते ११ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित जिल्हा समन्वय व सनियंत्रण समितीच्या सभेत करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, प्रभारी जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश मोहिते, फुलचूर पर्यटन व पर्यावरण विकास मंडळाचे अध्यक्ष सनदी लेखापाल राजेश चतूर, योग प्रशिक्षक विजय कावळे प्रामुख्याने उपस्थित होते.या स्मरणीकेत स्वस्थ व निरोगी राहण्याचे सुत्र, दैनिक योग करण्याचा अभ्यासक्रम, सर्वांगीण व्यायामाचे फायदे, हाताला, पायाला स्वस्थ ठेवण्यासाठी करण्यात येणारे सुक्ष्म व्यायाम, प्राणायाम, पोट, पाठ या आजाराबाबत करावयाचे व्यायाम, अष्टांग योगाचे सुत्र, सूर्य नमस्काराच्या १२ टीप्स, महत्वपूर्ण आसन, योग गीत, महत्वपूर्ण हस्त मुद्राये, पर्यावरण आणि शुध्द पाणी आणि ॲक्युप्रेशर पॉईन्टस् याबाबतची माहिती या स्मरणीकेत देण्यात आली आहे.