समाजाच्या न्याय हक्कासाठी सामाजिक संघटनांची गरज-बबलू कटरे

0
20

युवा भोयर पवार समाजाने केला गुणवंत विद्याथ्र्यांसह समाजातील प्रतिष्ठितांचा सत्कार
नागपूर,दि.०१ :समाजाच्या विकासासाठी आणि समाजाच्या प्रत्येक घटकाला भारतीय राज्यघटनेने दिलेले मूलभुत अधिकार प्राप्त व्हावे यासाठी प्रत्येक समाजाचे संघटन हे महत्वाचे असून सामाजिक संघटनेशिवाय कुठल्याही गोष्टी प्राप्त होऊ शकत नाही.तेव्हा आधी आपण भारतीय आणि नंतर जातीच्याही आधी ज्या प्रवर्गात मोडतो त्या ओबीसी प्रर्वगाचे नागरिक आहोत हे समजून घेणे गरजेचे आहे.आपणाला राज्यघटनेने जातीच्या आधारे न्यायिक अधिकार दिले नसून प्रर्वगाच्या माध्यमातून दिले असल्याने व्यक्तिस्वातंत्र्यासोबतच विचार स्वातंत्र्यच्या आ्रधारावर समाजातील प्रत्येकांने सकारात्मक व पुरोगामी विचार करण्याची गरज असल्याचे विचार गोंदिया जिल्हा ओबीसी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष बबलू कटरे यांनी व्यक्त केले. ते येथील युवा भोयर पवार मंचच्यावतीने ३० जुलै रोजी राही सभागृह जयताळा रोड नागपूर येथे आयोजित वार्षिक महोत्सव कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या महोत्सवाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय पोलीस अधिकारी हरीराम कामडी होते.तर .दरम्यान कार्यक्रमाचे उदघाटन पवार युवा संघटन नागपूरचे अध्यक्ष रमेश टेंभरे यांच्या हस्ते सुरवातीला दिपप्रज्वलन करुन करण्यात आले.टेंभरे यांनी आपल्या उदघाटनीय भाषणात समाजकारणासोबत राजकारण यावर विचार व्यक्त केले.सामाजिक कार्य करतांना राजकारणाचा हस्तक्षेप नको अशी अनेकांची अपेक्षा असते असे सांगत राजकारणाचा हस्तक्षेप समाजकारणात असायला हवा की नको यावर विचार करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.बबलु कटरे यांनी समाजकारण करतांना राजकारणाची गरज असल्याचे सांगत जेव्हा आपण सामाजिक कार्य करीत असतो तेव्हा आपल्या समाजाला जे काही हवे असते ते मागण्यासाठी सत्तेकडे जातो,यासाठी समाजकारण करतांना राजकीय सत्ता ही सुध्दा तेवढीच मह्त्वाची असून चांगल्या कार्यासाठी समाजकारणात राजकारणला विरोध न करता समाजकारणासोबतच सत्ता हे ध्येय अंगी बाळगावे असे विचार मांडले.शिक्षणावरही त्यांनी विचार व्यक्त करीत ओबीसींच्या न्याय लढाईमध्ये युवा भोयर पवार समाजाने सहभागी व्हावे असे आवाहन केले.
मुख्य अतिथी म्हणून पुर्ती उद्योग समुहाचे मानस अध्यक्ष सुधीर दिवे, अ.भा. भोयर पवार महासंघाचे काार्याध्यक्ष कुंजीलाल पराडकर, भोयर पवार विद्यार्र्थेी मंडळ कारंजाचे कार्याध्यक्ष नेतराम ढोबाळे, ओबीसी संघर्ष कृती समिती गोंदियाचे अध्यक्ष बबलू कटरे,प्राचार्य शिवानी कोकर्डेकर, निवृत्त व्यवस्थापक क्रिष्णा ढोबळे,क्षत्रीय पवार समाज संघठन बोरगावचे उपाध्यक्ष दिलीप बारंगे, पंचायत समिती कारंजाचे सभापती मंगेश खवशे व समाजसेविका सौ. महेश्वरी पटले उपस्थित होत्या.या कार्यक्रमात समाजाच्यावतीने प्रकाशित स्मरणिकेच प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.सोबतच डॉ.जयश्री चौधरी यांच्यावतीने नि:शुल्क आरोग्य शिबिर व रक्तदान शिबिरही आयोजीत करण्यात आले होते. नागपूरसह विदर्भातील युवा भोयर पवार व पोवार समाजातील गुणवंत विद्याथ्र्यांचा स्मृतिचन्ह व स्कॉलरशिप देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी सत्कारमुर्तीमध्ये वरिष्ठ कृषी वैज्ञानिक डॉ. विजय पराडकर, बेरार टाईम्सचे संपादक खेमेंद्र कटरे,व्यसनमुक्ती केंद्रप्रमुख अुंकर बिसेन, डॉ. मंगला गोरे, डॉ. शोभा गोरे, इंजि. नामदेवराव रबडे,उद्योजक विजय पारधी, यादवराव ढोले, पृथ्वीराज रहांगडाले, चंद्रकांत पटले, धनराज डोंगरे, शक्ति वासुदेव गोरे, सरीता विजय गाकरे, सुरेश खवशी, रेवता ह. धोटे, विनय बिसेन, टिकाराम घागरे, रोशना दि. ढोबाळे, धमेंद्र तुरकर, गिरीष बोबडे, विजय डोबले,अनंत ढोले, निकीता गौरव धारपुरे आqदचा समाजाच्या विकासासोबतच सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल सत्कार करण्यात आला.पुर्ती समुहाचे अध्यक्ष दिवे यांनी युवा भोयर पवार समाजाच्या कार्यक्रमातून सामाजिक संघटन बळकट कसे करावे याचे नियोजन दिसून येत असल्याचे स्पष्ट करीत शेतकरी हिताकरीता विद्यमान सरकारसोबतच पुर्ती उद्योग समुह काम करीत असल्याची माहिती दिली.सोबतच ज्या सत्कारमुर्तींचा सत्कार येथे झाला ते सर्वच आपल्याशी निगडित असल्याने आपणास आनंद झाल्याचे म्हणाले.यावेळी अनेक शिवानी कोकर्डेकर यांनी शिक्षणामध्ये बदल आणि समाज या विषयावर विचार मांडत भारत २०२० मध्ये कशा शक्तीशाली होऊ शकते यावर विचार व्यक्त केले यांच्यासोबत इतर मान्यवरांनीही विचार मांडले. आयोजनासाठी सुरेश देशमुख, कृष्णा देवासे, श्रावण फरकाडे, अजय फरकाडे, विलास डिग्रसे, गौरव धारपुरे, मुकुंद बन्नगरे, अरqवद देशमुख, अंजू देवासे, मुकेश चोपडे, प्रेमराज गोहले, सचिन धंडाळे, मोतीलााल चौधरी, नंदू रबडे, लालचंद चौधरी, मनिष कोढले, शालिनी देशमुख, अनिल डोंगरदिवे, अविनाश काटोले, संजय ढोले, हरीष ढोबाळे, विक्की बन्नगरे, चेतन खवशे, मदन ढोले, महेश बारंगे, ईश्वर चौधरी, मनोज चव्हाण, प्रो. महेश पवार, मोहन कडवे, विजय डोबले, डॉ. जयश्री चौधरी, डॉ. उदय चौधरी, डॉ. सुरेश चोपडे, डॉ. मयुर मुन्ने, डॉ. राजन ठाकुर, हिराचंद चौधरी, लक्ष्मण देवासेी, सुधाकर ढोले, डॉ. विजय पराडकर, कमलाकर चोपडे, घनश्याम चौधरी, सचिन धंडाळे, अनिल डोंगरदिवे यांच्यासह महिला कार्यकारिणीच्या सर्व महिला सदस्याने विशेष परिश्रम घेतले. सचांलन श्रीमती मंजु देवासे यांनी केले.